जेजुरी एमआयडीसीतील उद्योजकांना कोण धमकावतेय?
उद्योजकांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा उद्योजक संघटनेच्या अध्यक्षांचा आरोप
तर गरज पडल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करणार
उद्योग मंत्री मुख्यमंत्र्यांकडे करणारा तक्रार ; जिमाचे अध्यक्ष रामदास कुटे यांची माहिती
पुरंदर
जेजुरी एमआयडीसी मधील उद्योजकांना धमकावले जात आहे, त्यांना त्रास दिला जात आहे... त्याचबरोबर त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे . त्यांच्याकडून खंडणी वसुलीसाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जेजुरी एमआयडीसी मधील उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष रामदास कुटे केलाय. या संदर्भात आज जेजुरी येथील जिमाच्या सभागृहामध्ये तातडीचे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी जेजुरी येथील जिसा म्हणजेच जेजुरी इंडस्ट्रियल सर्व्हिसेस
संघटनेच्या माध्यमातून जेजुरी येथील उद्योजकांना धमकावले जात आहे. असा आरोप त्यांनी केलाय. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सावंत त्याचबरोबर जेजुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. मात्र याबाबतचे सर्व आरोप जिसा संघटनेचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी फेटाळून लावले आहेत.
राज्यातील विविध एमआयडीसी मध्ये उद्योजकांना धमकावणे किंवा त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे अनेक प्रकार राज्यात घडून येत आहेत. असे प्रकार झाले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले असतानाच जेजुरी मधील एमआयडीसी मध्ये असा प्रकार होत असल्याचे जेजुरी येथील उद्योजकांची संघटना जिमाच्या( जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) माध्यमातून सांगण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरी एमआयडीसी मध्ये अनेक छोटे मोठे उद्योग आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून जेजुरी आणि परिसरातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर परप्रांतीय देखील अनेक कामगार जेजुरी एमआयडीसीमध्ये काम करतात. मात्र सध्या जेजुरी एमआयडीसी मधील उद्योजकांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. काहीही गरज नसताना किंवा कोणत्याही प्रकारे अधिकार नसताना काही लोक या ठिकाणी पोलिसिंग करत आहेत. त्यामुळे अशा लोकांचा आम्ही निषेध करतो असं जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास कुठे यांनी म्हटले आहे. जेजुरी एमआयडीसी मधील उद्योगांनी शासनाच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या आहेत. मात्र जिसा या संघटनेच्या माध्यमातून जेजुरी एमआयडीसीमध्ये पॉलिटिकल टेरिझम सुरू आहे. तुम्ही या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत का नाही ते आम्हाला दाखवा. असे या संघटनेकडून बोललं जातं. मात्र अशा प्रकारचं पोलिसिंग करण्याचा त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. अशा प्रकारची विचारणा करणे म्हणजे उद्योगांना धमकावणे, उद्योजकांना ब्लॅकमेल करणे, उद्योजका कडून पैसे उकळणे असा हेतू यामध्ये दिसतो आहे. असं यांनी म्हटलं आहे. शासनाने आणि प्रशासनाने अशा प्रवृत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा. जेजुरी एमआयडीसी मध्ये विनाकारण फिरणाऱ्यांचा कंपनीमध्ये जाऊन बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर यापुढे खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल असं कुटे यांनी म्हटलं आहे. जेजुरी एमआयडीसी मधील सर्वच उद्योजक अत्यंत घाबरलेले आहेत. याचा परिणाम जेजुरी आणि परिसरातील लोकांच्या रोजगारावर होऊ शकतो. त्यामुळे जिसा संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ही पत्र वेगवेगळ्या कंपन्यांना दिलेले आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा जीमा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून. उद्योग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो असं ही त्यांनी म्हटले आहे.
रामदास कुठे यांचे आरोप जिसाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी फेटाळले
आम्ही जन्माने कर्माने आणि धर्माने जेजुरीकर आहोत. संपूर्ण एमआयडीसी ही जेजुरीच्या हद्दीत आहेत. जेजुरी येथील कामगार, उद्योजक आणि पुरवठादार यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही जेजुरीकर सक्षम आहोत. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी देखील आम्ही निश्चित सक्षम आहोत. आमची संघटना ही रजिस्टर संघटना आहे. धर्मादाय आयुक्त त्यांच्याकडे आमचे संघटनेचे रजिस्ट्रेशन आहे. आमच्या संघटनेने फक्त राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे तुम्ही कामगारांना सुविधा देत आहात का? याबाबतचीच विचारणा केली आहे. ज्या कंपन्या या सोयी सुविधा देतात त्यांचं आम्ही अभिनंदन केल आहे. त्या कंपन्यांकडे आम्ही पुन्हा पाठपुरावाही करत नाही.
पण ज्या कंपन्या कामगारांना सुविधा देत नाहीत. त्या कंपन्यांच्या विरोधात जिसा संघटना स्थानिक आमदार विजय शिवतरे, उद्योग मंत्री उदय सावंत, कामगार आयुक्त आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्याकडे जाऊन माहिती देणार आहोत. कामगार आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं जीसाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटलं आहे. जीसाचे अध्यक्ष रामदास कुठे यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.