नीरा येथे आढळून आलेल्या बेवारस व्यक्तीचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा शोध सुरू
नीरा येथे आढळून आलेल्या बेवारस व्यक्तीचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा शोध सुरू नीरा पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, जेजुरी पोलिसांकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी नीरा येथे एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ८५/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. तसेच २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी GD क्रमांक ०१४ नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस नोंदीत आहे. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ५० वर्षे, बांधा सडपातळ आहे. त्याच्या अंगात निळ्या व पिवळ्या रंगाचा चेक्स असलेला फुल बाह्यांचा शर्ट आणि चॉकलेटी रंगाची पॅन्ट होती. तसेच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्य...