Type Here to Get Search Results !

बारामती तालुक्यातील सावकार व्यवसायिकांना पोलीस प्रशासनाचा सज्जड दम

 राज्यामधील सावकारकीचा बंदोबस्त करण्यास सरकार यशस्वी होईल काय ? 

बारामती तालुक्यातील सावकार व्यवसायिकांना पोलीस प्रशासनाचा सज्जड दम




    बारामती ( पुणे )


  महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून कर्जबाजारी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहेत. खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून दररोज राज्यात कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत असते. शासन स्थरावरून  शेतकऱ्याची आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितलं जात. पण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत.

या आत्महत्येसाठी प्रमुख जबाबदार आहे तो  खाजगी सावकार. बँका,पतसंस्था यांच्यापेक्षा शेतकऱ्यांना  छळायचं काम करतो तो म्हणजे खाजगी सावकार. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागे खाजगी सावकाराच्या तगादा हे मोठे कारण राहिले आहे. सरकारने कर्जमाफी केली तरी बँकांच्या  कर्जाची होते मात्र खाजगी सावकार आणि पतसंस्था यांची कर्जमाफी होत नाही आणि त्यामुळेच शेतकरी आज खाजगी सावकार आणि पतसंस्थांच्या जाळ्यामध्ये अडकला आहे. त्यांच्याच त्रासाला  कंटाळून शेतकऱ्याला गळफास घेण्यापर्यंत जावं लागतं.


 बारामतीत कर्जदारांनीच घेतला सावकाराचा बळी 


         मात्र बारामती तालुक्यामध्ये  अगदी उलट प्रकार घडला आहे. बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील सावकारालाच कर्जदार शेतकऱ्यांनी कायमचा संपवलाय.15 लाख रुपये परत मिळवण्यासाठी या सावकाराने तगादा लावला होता. आणि यातूनच या सावकाराचा  खून करण्यात आला. यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आल आहे.  अशा प्रकारे कोणी खाजगी सावकार तुम्हाला त्रास देत असेल तर पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्याच आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आले आहे.


  काय आहे सावकार प्रकरण ? 


   बारामती तालुक्यातील रोहित गाडेकर हा एक सावकारी व्यवसाय करणारा. सोरटेवाडी गावातील तो रहिवासी होता. त्याच्याच गावातील अमोल वसंत माने, सागर वसंत माने व   विक्रम काकासो मासाळ यांना या सावकाराने व्याजाने पैसे दिले होते. मागील काही वर्षांपासून हे लोक त्याला  पैसे देत होते. मात्र व्याज आणि मुद्दल यामध्ये काहीही फरक पडत नव्हता. त्यातच हा सावकार कर्जदाराला मारहाण करत असे. चारचौघात अपमानित करत असे. पण यातूनच या तिघांनी चिडून जाऊन मग या सावकाराला संपवण्याचा कट केला.दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता या सावकाराला पैसे देतो असं सांगून एका निर्जन स्थळी बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. 

         यानंतर याप्रकरणी अमोल माने आणि सागर माने या दोघांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान खून केलेले हे दोघे आरोपी फरार झाले होते. मात्र या आरोपींना पोलिसांनी 24 तासाच्या आत जेर बंद केलं आणि याच घटनेतील आणखी एक आरोपी तपास दरम्यान पोलिसांना निष्पन्न झाला. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता रोहित गाडेकर हा त्यांना व्याजाच्या पैशासाठी त्रास देत होता. व्याजाच्या नावाखाली जास्तीचे पैसे त्यांच्याकडून घेत होता. त्यांना मारहाण करत होता आणि म्हणूनच आपण त्याचा खून केल्याची कबुली त्यांनी आरोपींनी दिली. 



  पोलिस  प्रशासनाचे आवाहन...


यानंतर आता बारामती तालुक्यातील पोलीस प्रशासन खडबडून जाग झाले आहे. आज पर्यंत सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी आता सावकाराला संपवायला निघाल्याचे या एका प्रकरणातून निदर्शनास आले. त्यामुळे आता बारामती पोलिसांनी अशा प्रकारची  घटना घडत असेल किंवा जर कोण खाजगी सावकारकी करत असेल आणि लोकांना व्याजासाठी त्रास देत असेल तर याबाबतची फिर्याद पोलिसात द्यावी. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. असं  बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितल आहे. त्याचबरोबर खाजगी सावकारांना न  घाबरण्याचे आवाहन त्यांनी केला आहे. तर खाजगी सावकारांना देखील सज्जड दम दिलाय.


राज्यभरातील  खाजगी सावकारीला आळा घालण्यासाठी सरकारी धोरण आवश्यक 



राज्यभरात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कर्जबाजारीपणा हा जबाबदार असल्याचे म्हटलं जातं. बँकांच्या कर्जांचा तगादा कमी आहे. मात्र खाजगी सावकाराचा त्रास  हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. खाजगी सावकारकीच्या जाचातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केलं होतं. मात्र त्यानंतर कर्जाची उपलब्धता  सोपी व्हावी, लोकांना तातडीने कर्ज मिळावं म्हणून वेगवेगळ्या नागरी पतसंस्था निर्माण झाल्या. मात्र या नागरी पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकरी अडचणीत आला आहे. अडचणीत आलेल्या शेतकरी आता पुन्हा एकदा खाजगी सावकाराच्या आश्रयाला गेला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते. म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर खाजगी पतसंस्था आणि खाजगी सावकार यांच्यावर नियंत्रण आणण्याचा मोठ आव्हान पोलिसांसमोर पर्यायाने सरकार समोर आहे. यासाठी राज्य सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची देखील गरज आहे. अस प्रगतिशील शेतकरी सुधीर निगडे यांनी म्हटलंय.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies