Type Here to Get Search Results !

आद्य रामायणकाराच्या नगरीमध्ये घुमला श्रीराम नामाचा जयघोष

 आद्य रामायणकाराच्या नगरीमध्ये घुमला श्रीराम नामाचा जयघोष


वाल्हे येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा



 वाल्हे


  पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे, येथील आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकीऋषी मंदिरामध्ये जय श्रीरामांचा जयघोष करण्यात आला आकर्षक फुलांनी सजविलेले मंदिरामध्ये , राम जन्मला गं सखे राम जन्माला... असे भजन गात पाळणा हलवून पुष्पवर्षाव करत शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त काकडआरती, अभिषेक, भजन, प्रवचन, पाळणा, पुष्पवृष्टी, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले होते. श्रीरामनवमी निमित्त माजी सरपंच अमोल खवले व उद्योजक मोहन पवार यांच्या हस्ते श्रीराम यांच्या पादुकांसह महर्षी वाल्मिकींच्या समाधीला दुग्धाभिषेक करण्यात आला.

  


रामनवमीनिमित्त प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेसभोवती पाना-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रामजन्मोत्सव साजरा करण्यासाठी पाळणा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळी दहा ते बारापर्यंत प्रवचनकार दत्तात्रय महाराज थोपटे व शिवाजीमहाराज भोसले यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे प्रचवन झाले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी करीत श्रीरामाचा गजर केला. यावेळी भजन तसेच रामजन्मोत्सव गीते गाण्यात येत होती. कार्यक्रमादरम्यान महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे भजनाच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.



 दुपारी १२ वाजता उपस्थित भाविकांनी 'श्रीरामचंद्र भगवान की जय', 'सीयावर रामचंद्र भगवान की जय', असा जयघोष केला. या वेळी मंत्रपुष्पांजली, आरती झाल्यानंतर 'श्रीराम जय राम जय जय राम', च्या जयघोषात रामजन्मानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महिला मंडळानेप्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवासाठी तयार केलेल्या पाळण्याची दोरी ओढून विविध पाळणागीते व भावगीते सादर केली. तदनंतर सुंठड्याचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies