बारामती नंतर आता इंदापूर मध्ये रस्त्यावर हाणामारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दम दिल्यानंतर तरुणाई ऐकना
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
इंदापूरमध्ये अपघातानंतर मारामारी तर याप्रकरणी जणांवर शांतता भंगाचा गुन्हा दाखल..
बारामती ( पुणे )
बारामती तालुक्यातील एका हॉटेल व्यवसायिकाला तरुणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली होती. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अस म्हटलं होतं. अशा प्रकारच्या तरुणांच्या गुन्हेगारी कृत्यावर कडक कारवाई केली जाईल म्हटलं होत. पोलिसांना कशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आले होते. तर पोरग आहे पोटात घ्या, असं म्हणायला कोणी पुढे येऊ नका असं आवाहन देखील मुलांच्या पालकांना पवार यांनी केलं होतं. मात्र बारामती शेजारी असलेल्या इंदापूर तालुक्यात अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. काही तरुणांच्या टोळक्यामध्ये रस्त्यावरच जबरदस्त मारहाण झाली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. याप्रकरणी आठ जणांवर शांतताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय .
इंदापूर शहरातील स्मशानभूमीजवळ हा मारहाणीचा प्रकार घडला आहे.आठ जणांवर शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री शंभर फुटी रस्त्यावर दोन मोटरसायकलींचा किरकोळ अपघात झाला. पण या अपघातानंतर वाद चांगलाच चिघळला... आणि त्याचे रूपांतर थेट भांडण आणि मारामारीत झालं. यानंतर या मारहाणचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला. यामुळे शहरातील शांतता भंग होऊ नये म्हणून..आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंदापूर पोलिसांनी स्वतः फिर्याद देत ही कारवाई केली आहे. एक प्रकारे अजितदादांच्या आदेशाचे पालन पोलीस प्रशासनाच्या वतीने तातडीने करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तरी देखील या भागात होणाऱ्या गुंडागर्दीवर आणि गुन्हेगारीवर काळा बसवण्याच मोठ आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याच मतदारसंघात आणि त्यांचा पक्षाच्या मंत्र्याच्या मतदारसंघात अशा प्रकारचे गुंडागर्दी वाढत असल्याने आता हा चिंतेचा विषय झाला आहे.