बारामतीच्या या गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बारामती ( पुणे)
बारामती तालुक्यातील मूर्टी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोप ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बारामती येथील मूर्टी येथे हा प्रकार घडला आहे. आरोपी आण्णा किसन गोफणे रा.मोराळवाडी ता.बारामती जि.पुणे याने दिनांक 20/4/2025 रोजी दुपारी तीन वाजलेच्या दरम्यान हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा केला आहे. आरोपीने पिढीत निर्भयाच्या घरामध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये ती एकटीच असल्याचे पाहून तिच्या वर लैंगिक अत्याचार केले. हा घडलेला सर्व प्रकार पिढीतेने आपल्या घरातील लोकांना सांगितला. त्यानंतर याबाबतची फिर्याद वडगाव निंबाळकर पोलिसात देण्यात आली आहे.
यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याचा अधिकचा तपास बारामती उपविभागाचे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड करीत आहेत.