वाल्हेत जिल्हा बॅकेचा वर्धापनदिन साजरा
वाल्हे,ता.५:सध्या कडक उन्हाळा असल्याने डोंगरातील पाणवठे कोरडे पडले आहेत. तीव्र उन्हामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती सुरू झाली
आहे. जिल्हा बॅकेच्या वाल्हे शाखेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाल्हे(ता.पुरंदर) परिसरातील डोंगरामध्ये कृत्रिम पाणवठ्यात
टॅकरद्वारे पाणी सोडुन त्यांची तहान भागविण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे, गौरवोदगार पुणे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी
काढले.
शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे नाते असणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा वाल्हे(ता.पुरंदर) या बॅकेचा आज शनिवार (दि.5) 55 वा
वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाचे औचित्य साधत शाखेतील कर्मचाऱ्यांनी सकाळी वाल्हे नजिक कुंदारा येथील
डोंगरामध्ये कृत्रिम पाणवठ्यामध्ये पुणे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वन्यप्राण्यांसाठी ठॅकरद्वारे पाणी सोडण्याचा
अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी प्रा. दुर्गाडे बोलत होते. याप्रसंगी आडाचीवाडी सरपंच सुवर्णा पवार, माजी सरपंच दत्तात्रय पवार, अमोल खवले,
अशोक बरकडे, सुर्यकांत पवार, कैलास पवार, अरविंद पवार, बाळासाहेब भुजबळ, रविंद्र दुर्गाडे, दादासाहेब राऊत, बजरंग पवार, सचिन पवार आदि उपस्थित
होते.
तदनंतर वाल्हे शाखेमध्ये बॅकेच्या खातेदारांच्या यांच्या हस्ते केक कापुन शेतकरी सभासदांना पेढे वाटण्यात आले.