बारामतीत मी जेवढं काम केलं तेवढं काम करणारा आमदार तुम्हाला शोधून सापडणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार यांची शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका बारामतीत पुन्हा हाणामारी झाली तर मोका लावील
बारामती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामती तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी दिल्या आणि यानंतर त्यांनी बारामती येथे दिव्यांगांना सायकल वाटप केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केलं ते पाहा.. आणि मी केलेलं काम पाहा..मी अजूनही काम करणार आहे असं म्हणत पवार यांनी शरद पवार यांच्या कारकीर्दीवर देखील बोट ठेवलेय...अप्रत्यक्षरीत्या अजित पवार यांनी शरद पवारांवर टीका केलीय..
बारामतीत दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सायकलचा वाटप करण्यात आल. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,बजेटमध्ये डीपीडीसीला 22000 कोटी दिले. त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याची तरतूद केली आहे. दिव्यांगाना सहानभूती नको तर समान संधी दिली गेली पाहिजे.असेही पवार म्हणाले
बारामतीतील विकास कामांचा चुकीचा वापर
मी बारामतीत विकास कामे करतो आहे. पण काही जण वेडे वाकडे पणा करतात.. काही जण तर फुटपाथवर गाडी लाऊन गप्पा मारत होते..पोलिसांना गाडी जप्त करायला सांगितले आहे. आता असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपण जी विकास कामे करतो त्याचा चांगल्या पद्धतीने वापर व्हायला पाहिजे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण
दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही..पण काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं. अस ते म्हणले.
आपली मुलं काय करतात यावर पालकांनी लक्ष ठेवावं.
परवा माझ्याकडे क्लिप आली. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं. मी पोलिसांना सांगितलं कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असं चालत राहिल तर मी मोका लावीन. असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला.आपली मुलं काय करत आहेत ? यावर लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पारपाडावी. मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोरगं आहे,पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखा. अस म्हणत अजित पवार यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू पाहणाऱ्यांना सुनावले.