जेजुरी नगरपरिषद देणार पथ विक्रेत्यांना प्रमाणपत्र, ओळखपत्र
पुरंदर प्रतिनिधी : जेजुरी नगरपरिषद कार्यालयामध्ये शहर फेरीवाला समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. शासकीय निर्णयानुसार ज्या पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा शहर फेरीवाला समिती अध्यक्ष चारुदत्त इंगुले यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली.
या सभेमध्ये महाराष्ट्र शासनाने दि. १२ मार्च २०२५ रोजीच्या राजपत्रबाबत विचार विनिमय करण्यात आला. तसेच नगर पथविक्रेता समिती व स्थानिक प्राधिकरण यांच्या विचार विनिमयाद्वारे योजना निश्चिती बाबत व अंमलबजावणी बाबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली.
जेजुरी शहरात 856 पथ विक्रेत्यांची अधिकृत नोंद झाली आहे. या सर्व सदस्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून नगर पथविक्रेता लाभार्थ्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देणेबाबत निर्णय निश्चित करण्यात आला व शुल्क निर्धारित करण्यात आले.
शासनाद्वारे निश्चित परिपत्रका नुसार नगर पथविक्रेता योजना अंमलबजावणी बाबत कार्यवाही करणेचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सदर बैठकीस मुख्याधिकारी तथा अध्यक्ष चारुदत्त इंगुले, नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक अक्षयकुमार शिरगिरे, बांधकाम अभियंता सुनील ताजवे, समुदाय संघटक अमर रनवरे, शहर फेरीवाला समिती जेजुरी नगरपरिषदचे सदस्य
निलेश भुजबळ,
स्वाती माळवदकर, हरिदास रत्नपारखी, विशाल भोसले, हनुमंत खोमणे,
बाळासाहेब माळवदकर, संगिता चांदेकर, लतिफा मणेर, गौरी लांघी, सुनंदा घोरपडे,
दत्तात्रय हरिश्चंद्रे, जयश्री रोमण आदी उपस्थित होते. चौकट:-
जाणीव संघटणेचे कार्यवाह संजय शंके यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने सलग तीन वर्षे नगरपरिषद संचालनालय महाराष्ट्र राज्य व सह आयुक्त पुणे यांच्या कडे पाठपुरावा केला. तेव्हा महाराष्ट्र राज्यातील पहिली पथ विक्रेता समिती बैठक पार पडली. संघटनेचे अध्यक्ष निलेश भुजबळ यांनी बैठकी पुर्वी सुचविण्यात आलेल्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले आहेत.
जेजुरी शहरातील हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. -
चौकट...... दिलासा जन विकास संस्थाच्या सहकार्यवाह श्र्वेता ओतारी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने सलग तीन वर्षे नगरपरिषद संचालनालय महाराष्ट्र राज्य व सह आयुक्त पुणे यांच्या कडे पाठपुरावा केला. तेव्हा महाराष्ट्र राज्यातील पहिली पथ विक्रेता समिती बैठक पार पडली. दिलासा जनविकास संस्थेच्या अध्यक्षा स्वातीताई माळवदकर यांनी बैठकी पुर्वी सुचविण्यात आलेल्या विशेष विषयांवर सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले आहेत. त्या मध्ये महिला पथ विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. सर्व पथ विक्रेता समिती सदस्यांना ओळख पत्र लेटरहेड व इतर सर्व साहित्य नगरपरिषद उपलब्ध करून देणार आहे.
जेजुरी शहरातील हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.