बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी वालचंदनगर पोलिसांनी घेतला ताब्यात.....
इंदापूर
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी..... सुरज उर्फ बापू दशरथ गोसावी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव..... सहा महिन्यापूर्वी बोपदेव घाटात तरुणीवर झाला होता सामूहिक अत्याचार.....आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी अकलूज मधून ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती..... दीड तासापूर्वी वालचंद नगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..... पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात आरोपीला दिल जाणार.....
सहा महिन्यांपूर्वी सासवड शेजारील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ...... संबंधित आरोपीला वालचंद नगर पोलिसांनी अकलूज मधून ताब्यात घेतला आहे. आणि थोड्याच वेळात वालचंद नगर पोलीस या आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत... बापू उर्फ दशरथ गोसावी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.....
दि. 3 ऑक्टोबर रोजी मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रात्री घडली होती. यानंतर याघटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला होता. हे आरोपी पकडण्याच मोठ आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते.पिढीतेनं सांगितल्या वर्णनानुसार स्केच काढून पोलिसांनी या पूर्वी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. राहिलेला एक आरोपी देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय..