आधी मैत्री, मग अत्याचार : खंडणी, मर्डरचं प्लॅनिंग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत चाललंय तरी काय ?
बारामती( पुणे)
बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात एका महिलेनें गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये या महिलेने ज्यांच्या विरोधात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची खंडणी उकळल्याची व खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी, त्याच बरोबर खुनाच्या कटात सहभागी होण्यासाठी दबाव टाकल्याची फिर्याद दिली आहे. यातील तीन आरोपीनी सामूहिक अत्याचार करून फोटो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करून साडेचौदा लाख रुपयांची खंडणी घेतल्याच तीन म्हटलं आहे. तर याच फिर्यादीत एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येच्या कटाची माहिती देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या गुन्ह्यातील पीडित महिला ही मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने माळेगाव मध्ये राहते. दरम्यान ती माळेगाव मधील एका जिम मध्ये व्यायामला जात होती. तेव्हा तिची गणेश सर्जेराव पवार राहणार प्रगतीनगर तांदुळवाडी रोड बारामती. जि. पुणे. यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतून एकमेकांचे नावं पत्ता आणि मोबाईल नंबर घेऊन एकमेकांचा संपर्क झाला. यातून गणेश पवार याने या महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी फोटो व्हिडीओ काढले नंतर आरोपीने महिलेला फोटो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायला सुरवात केली. यावेळी गणेश पवार याने त्याच्या मित्राच्या खात्यावर वेगवेगळ्या वेळी आकरा लाख सत्तर हजार रुपये खंडणी स्वरूपात घेतले. याशिवाय या महिलेवर माळेगाव येथे तिच्या घरी, सुयश हॉटेल भिगवण, तापोळा, या व इतर ठिकाणी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले.
याचवेळी या आरोपी वा त्याचे मित्र महेंद्र खैरे, पिसे, यांनी या महिलेला धाक दाखवून तिरुपती बालाजी या ठिकाणी घेऊन गेले. आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केले.
यानंतर या महिलेला खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून बारामती येथील पत्रकार मच्छिन्द्र टिंगरे यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करायला सांगत होते. या महिलेने या कामास नकार दिल्यावर आरोपीनी या महिलेमार्फत मच्छिन्द्र टिंगरे यास कुठल्यातरी माळरानावर बोलवून घेऊन त्यांचा खून करण्याचा कट आखला होता. अशी धक्कादायक माहिती या महिलेने तीच्या तक्रारीत दिली आहे.
आरोपी करायचे आरटीओसाठी वसुली : मच्छिंद्र टिंगरे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
दरम्यान यातील आरोपी गणेश पवार हा या महिलेच्या अकाउंट वर पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, बारामती, अहिल्यानगर,अकलूज येथील आरटीओ अधिकाऱ्यांसाठी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून हप्ताच्या स्वरूपात महिन्याला जवळपास दीड ते दोन कोटी रुपये गोळा करीत होता. या पीडित महिलेलच्या खात्यावरच ट्रक मालकांचे पैसे घेऊन तो अधिकाऱ्यांना पाठवात होता. ही गंभीर बाब देखील या गुन्ह्याच्या निमित्ताने पुढं आली आहे. आता या प्रकरणी पत्रकार मच्छिन्द्र टिंगरे यांनी याबाबत सबळ पुरावे उपलब्ध केले असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मच्छिन्द्र टिंगरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी या घटनेतील आरोपीनी आजपर्यत केलेले अनेक प्रकरण पुढं आणली आहेत. माझ्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा का दाखल करण्यामागचा हेतू काय आणी माझ्या मर्डर चं प्लॅनिंग कोण करतय? याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकारणातील कट करणारे मास्टरमाईंड नेमके कोण आहेत याचा शोध लागेपर्यत आपण शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झालेले आहेत. पोलीस प्रशासनाच्यावतीने त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी दिली
आहे.