Type Here to Get Search Results !

सोमेश्वरच्या उपाध्यक्षपदी पै. मिलिंद कांबळे.

 सोमेश्वरच्या उपाध्यक्षपदी पै. मिलिंद कांबळे.   




सोमेश्वर नगर. दि. ३

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा राज्यात आपल्या सशक्त नेतृत्व आणि प्रगत विचारसरणीमुळे ओळखला जातो. या कारखान्याच्या उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर पै. मिलिंद बळवंतराव कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ सभागृहात गुरुवार दि.(३) पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाली.


कृषी, कुस्ती आणि नेतृत्वाचा संगम.  


मिलिंद कांबळे हे अत्यंत प्रगतशील बागायतदार असून त्यांचे शेतीशी निस्सीम नाते आहे. ते स्वतः आपल्या शेतामध्ये कामगारांबरोबर खांद्याला खांदा लावून मेहनत करताना दिसतात. यासोबतच कुस्ती क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे सोमेश्वर नगर परिसरात त्यांचा मोठा मित्रपरिवार असून, समाजकार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक निर्णय. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड प्रक्रिया पार पडली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तीला व्हाईस चेअरमनपदाची संधी मिळाली आहे, यामुळे हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.


प्रमुख मान्यवरांची उपस्थिती


या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या वेळी माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, संचालक संभाजी होळकर, संग्राम सोरटे, अभिजीत काकडे, सुनील भगत, लक्ष्मण गोफने, अनंत तांबे, शैलेश रासकर, ऋषी गायकवाड, जितेंद्र निगडे, शिवाजी राजे निंबाळकर, आनंद कुमार होळकर, शांताराम कापरे, हरिभाऊ भोंडवे, तुषार माहुरकर याबरोबर सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी जबाबदारी पार पाडली.


सोमेश्वर परिसरात आनंदोत्सव. ‌


मिलिंद कांबळे यांच्या निवडीमुळे सभासद, कामगार आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या मित्रपरिवाराने सोमेश्वर कारखाना आणि करंजेपूल चौकात पेढे वाटून जल्लोष साजरा केला.


सभासदांना आणि कामगारांना होणार लाभ


मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वामुळे निश्चितच सोमेश्वर साखर कारखान्याच्या सभासद आणि कामगार बांधवांचे हित जपले जाईल. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याचा विकास वेगाने होईल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies