पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले.
नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?
पुरंदर :
नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार. भरधाव स्कॉर्पिओनी सुमारे सहा दुचाकींना धडक देत दुचाकीस्वारांना जखमी केले असून. सर्वांवर नीरेतील विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना बारामती व लोणंद येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कार्पियो क्र. एम.एच. ४२- एक. क्यू. ७८७८ या गाडीतील ऐका महिलेला सर्पदंश झाल्याने चालक गाडी वेगात दामटत असल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी (दि.२९) रोजी रात्री नऊच्या सुमारास होळ (ता. बारामती) येथील एका गरोदर महिलेला सर्पदंश झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्या महिलेला थेट स्कार्पिओ गाडीत बसून आधी सोमेश्वरनगर व नंतर त्यांची टिर्टमेंट असलेल्या नीरा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाचारण केले. नीरा बारामती रोडने वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने स्कार्पिओ चालकाला गाडी वेगात चालवणे कठीण जातं होते. अती वेगात असलेल्या या स्कार्पिओ चालकाने गाडी कधी रस्त्याच्या मध्यावरुन तर कधी थेट विरुद्ध बाजूने दामटायला सुरवत केली. या दरम्यान सोमोरुन आलेल्या दुचाकिंना समोरासमोर ठोस देत हवेत उडवले.
नीरा येथे ज्युबिलंट पंचायतन मंदिरासमोर तर सरळ सरळ विरुद्ध दिशेने येत एकाच वेळी चार दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातांत सुमारे आठ ते दहा लोकांना जखमी केले आहे. काही जखमींना नीरेतील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन घरी सोडले आहे तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बारामती किंवा लोणंदच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
अती वेगात आलेल्या या स्कार्पिओने नीरेतील एका खाजगी रुग्णालयासमोर आल्यावर सर्व जखमी व नुकसान झालेल्या दुचाकींचा दुरुस्तीचा खर्च देतो म्हणत सर्पदंश झालेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही महिला तीन महिन्यांची गरोदर असून, सर्पदंश झाल्याने तीच्यावर उपचार सुरू आहेत.