दिवे घाटात का झाली वाहतूक कोंडी.
घाट माथ्यापर्यंत व वडकी गावापर्यंत वाहनांच्या रांगा.
नीरा :
पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील दिवे घाटात चालू असलेल्या रुंदिकरणामूळे वाहतूक कोंडी झाली आहे. आज सोमवारी घाटात रुंदीकरण करण्यासाठी ब्लास्टिंग लावले होते. त्यामुळे तासभर रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असतो. हा सोहळा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिवे घाटातून जाणार आहे. या पुर्वी घाटातील रस्ता वारकऱ्यांना सुखकर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने घाटातील रुंदीकरण वेगात सुरू आहे.
मागील आठवड्यात शेवटचे तीन दिवस सलग सुट्टीचे दिवस होते. या काळात रस्त्याच्या कामाला गती देणे गरजेचे होते. आज सोमवारी ऐन कामाच्या दिवशी दिवे घाटात रुंदीकरण करण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आले. यामुळे दोन्ही बाजुंनी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. काही बेशिस्ती वाहनचालकांमूळे वाहतूक कोंडी झाली आहे. एसटी बसमधील प्रवाशांना उकाड्याचा प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले आहे. लहान मुलांनी रडून त्रीधा केली आहे.
घाटातील रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग हे शकतो रात्रीच्या वेळी करावे असे एसटी बस मधिल प्रवाशी संगत होते. यामुळे दिवसा वाहतूक कोंडी होणार नाही. दिवसभर इतर कामं करणे सोयिस्कर होईल.