चारित्र्यावर संशय घेत पतीनेच घोटला पत्नीचा गळा....
300 किलोमीटर अंतरावर नाशिकच्या नांदगाव घाटात फेकला मृतदेह.....
स्वतःच गळा घोटून बायको हरवल्याची इंदापूर पोलिसात दिली होती तक्रार....
तबल तीन महिन्यानंतर इंदापूर पोलिसांनी उलघडलं खुनाच रहस्य.....
इंदापूर पोलिसांनी आरोपी पतीसह आणखी एकाच्या आवळल्या मुसक्या
इंदापूर (पुणे)
पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये एकानं आपली स्वतःची बायको हरवण्याची तक्रार इंदापूर पोलिसात दिली होती. तीन महिने झाले तरी त्याची बायको पोलिसांना आढळून येत नव्हती. अखेर पोलिसांना धागा दोरा लागला आणि फिर्यादीच खुनी निघाला. काय आहे इंदापूर तालुक्यातील या महिलेच्या खुणा मागचा रहस्य? चला तर मग जाणून घेऊया...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला खून
पुण्याच्या इंदापूर मध्ये धक्कादायक अशी घटना घडलीय...बायकोवर चारित्राचा संशय घेत पतीनेच बायकोचा गळा आवळत तिचा खून केलाय,त्यानंतर तिचा मृतदेह इंदापूर पासून जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे दीडशे फुट खोल फेकून दिला.. यानंतर पोलिसात मात्र बायको हरवल्याची तक्रार या महाशयानं दिली.मात्र तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांनी या मृत्यूचं गूढ उलघडलय....
इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा 2013 साली इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील ज्योतीराम करे याच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांना दोन अपत्य ही झाली. दरम्यान मागील काही महिन्यांपासून ज्योतीराम करे याचा पत्नी प्रियंकाच्या चरित्रावर संशय होता.यातून दोघात वाद असायचे. त्यानंतर 29 जानेवारी 2025 रोजी ज्योतीराम करे यानं इंदापूर पोलिसात आपली बायको हरवण्याची तक्रार दाखल केली होती....
प्रियंका करे हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना या महिलेचा कुठेच थांबवता लागत नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांकडे चौकशी केली तरी देखील तिचा मागणी पोलिसांना लागत नव्हता. मग मात्र पोलिसांनी आता उलटा विचार करायला सुरुवात केली. ही महिला हरवली नाही तर तिचा खून झाला असावा असा संशय इंदापूर पोलिसांना येऊ लागला आणि पोलिसांनी त्या दृष्टीने आपली पावलं टाकली.... ज्योतीराम करे हा सातत्याने पोलिसांना बनवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी पोलिसांपुढे त्याचं काही चाललं नाही, पोलीस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर घाटात पोहचले आणि तब्बल दीडशे फूट खोल दरीत फेकलेला कुजलेल्या अवस्थेतील प्रियंका सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला....
ज्योतीराम ने आधीच केली होती नांदगावच्या डोंगरदरीत रेकी : मित्राने दिली साथ
ज्योतीराम करे हा साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारा ट्रॅक्टर चालवतो. त्यामुळे त्याला या परिसराची चांगली माहिती होती. हे हत्याकांड करण्यापूर्वी त्याने या भागाची जणू काय रेकीच केली होती. आपल्या आणखी एका मित्राच्या सहाय्याने त्याने नांदगावच्या डोंगरदरीत प्रियंकाचा मृतदेह फेकला. प्रियंका चा शोध लावणं हे इंदापूर पोलिसांसमोर एक कडवं आव्हान होतं, मात्र तीन महिन्यानंतर पोलिसांनी प्रियंका हरवली नाही तर तिची हत्या झालीय याचा तपास लावला आणि थेट प्रियंकाचा सांगाडाच पोलिसांच्या हाती लागला.... याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी ज्योतीराम करे आणि दत्तात्रय गोलांडे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत....