बारामती येथे अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ सहकार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
पुरंदर
माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात प्रहारच्यावतीने सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर रात्री आठ ते बारा यादरम्यान आज आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ हे बारामती मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. पुरंदर तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे गाव असलेल्या खानवडी येथून आसूड घेऊन ते बारामती जाणार होते. मात्र तत्पूर्वीच सकाळी दहा वाजता मंगेश ढमाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेय.. यानंतर मंगेश ढमाळ यांनी या घटनेचा निषेध केलाय..