सुनेकडून सासूचा खून , खून करून मृतदेह गोणीत टाकून सून फरार..
भिंतीवर डोक आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती...
जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील धक्कादायक घटना...
सविता शिंगारे वय 45 वर्ष असं मयत महिलेचं नाव...
जालन्यात सुनेनं सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची धक्कादायक घटना घडलीये.. संगिता संजय शिनगारे असं या मयत महिलेचं नाव असून शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी काॅलनीतील ही घटना आहे.. भिंतीवर डोख आपटून हत्या करण्यात आली.. गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्यानं सून तिथेच मृतदेह सोडून फरार झालीये.. घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.. दरम्यान फरार आरोपी सुनेचा पोलीस शोध घेत आहेत..