जेजुरी पोलीस स्टेशनमधील बेवारस वाहनांचा लिलाव.
कधी होणार लिलाव काय आहेत अटी शर्ती वाचा.
पुरंदर :
जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये गेली १० ते १५ वर्षांपासून असलेली चारचाकी व दुचाकी वाहने पडून आहेत. पोलीस स्टेशन मध्ये पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया झाली आहे. उद्या गुरुवारी (दि.१७) सायंकाळी ०५ वाजेपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी केले आहे.
जेजुरी पोलीसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानूसार. सदरचा उपक्रम हा मा. मुख्यमंत्री म.रा. मुंबई यांचे १०० दिवसाचे निर्गती कार्यक्रमामध्ये समाविष्ट आहे व त्याची अमंलबजावणी करणे आवश्यक असल्याने जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये मागील १० ते १५ वर्षापासुन लावण्यात आलेली आहेत. सदर दुचाकी व चारचाकी वाहने सुरक्षीत ठेवणे करण्या करीता पोलीस स्टेशन येथे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांचा लिलाव करणेसाठी मा. तहसिलदार साो, पुरंदर यांनी मान्यता दिली असुन सदर वाहनांचे मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग यांनी मुल्यामापन केलेले असुन लिलावाची संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झालेली आहे.
सदरचा लिलाव दिनांक १७/०४/२०२५ रोजी सायकाळी १७.०० वा जेजुरी पोलीस स्टेशन येथे होणार असुन ईच्छुकांनी आपला परवाना बाबतचे कागदपत्रे घेवुन दिनांक १७/०४/२०२५ रोजी सकाळी १०.०० ते १७.०० वा पर्यत आपले अर्ज जेजुरी पोलीस स्टेशनचे मुददेमाल कारकुन पोलीस हवालदार / मुजावर व पोलीस हवालदार/माने यांचेकडे सादर करून बेवारस वाहनांचे जाहिर लिलावाचे बाबत अटी व शर्तीबाबत त्यांचेकडुन माहिती घ्यावी. दिनांक १७/०४/२०२५ रोजी सायकांळी १७.०० वाजले नंतर येणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही.
संपर्क -: पोलीस हवालदार/१११६ विनोद हनुमंत माने (मुददेमाल कारकुन ) -: ९७६६५०५८३७