आई-वडिलांना त्रास नको म्हणून अल्पवयीन मुलीन स्वतःलाच संपवले
कोऱ्हाळे येथील अल्पवयीन मुलीला लग्नासाठी दमदाटी
कुटुंबाला कोयत्याने मारण्याची दिली होती धमकी
अखेर त्या अल्पवयीन मुलीने घेतला गळफास
बारामती
आपल्या स्वतःच्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील एका अल्पवयीन मुलीला स्वतःला संपवाव लागले आहे. गावातील गुंडांच्या त्रासाला वैतागून तिने अखेर गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या सर्व घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा हकनाक बळी गेला आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वतु माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या कुटुंबाला कोयत्याने मारून टाकेल' अशी धमकी देऊन तिला त्रास दिला जात होता. तिला शाळेत जात असताना रस्त्यावर अडवलं जात होतं. चिडवल जात होतं.मात्र कित्येक महिने तिने हा त्रास सहन केला. आपल्या वडिलांना याबाबतची माहिती दिली. वडिलांनी देखील त्या नराधमांना समजून सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही.अखेर त्या अल्पवयीन मुलींना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आपणन मरावं असं वाटलं. आणि तिने मृत्यूला कवटाळलं... ही घटना आहे बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील.
कोऱ्हाळे खुर्द येथे राहणारा विशाल गावडे हा युवक या तरुणीला त्रास देत होता. तिच्या शाळेत जाण्याच्या मार्गावर तिला अडवून तिच्याकडे लग्नाची मागणी करत होता. तर त्याचे मित्र प्रवीण गावडे, शुभम गावडे, सुनील खोमणे हे त्याला साथ देत होते. पीडित मुलगी रस्त्याने जात असताना तिला वहिनी म्हणून चिडवत होते. अखेर या मुलीने याबाबतची माहिती आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी संबंधित मुलांना समजावून सांगितले मात्र तरी देखील या मुलांचा त्रास कमी झाला नाही.
दहावीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर ही मुलगी सोमेश्वरनगर येथे क्लासला जात होती. संबंधित आरोपींनी तिथे देखील या मुलींना त्रास दिला. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मोटारसायकलवरून तिचा पाठलाग केला. दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी यातील आरोपी हातामध्ये कोयते घेऊन पीडित मुलीच्या घरी गेले. यावेळी त्यांनी ' तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझ्या आई-वडिलांना संपवून टाकेल' अशी धमकी दिली. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिची समजूत काढली उद्या आपण पोलिसात तक्रार करू असे सांगितले. दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने तिच्या वडिलांना सांगितले की, संबंधित आरोपींनी दिलेल्या धमकीची मला भीती वाटत आहे. ते तुमचे मुंडके उडवतील. मात्र वडिलांनी तिला समजून सांगितले. सकाळी दूध पोहचवून आल्यावर पोलिसात तक्रार देण्याचे ठरले. कामासाठी बाहेर गेले. भेदरलेल्या या मुलींना अखेर दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये. आई-वडिलांना कोणी मारू नये. या भावनेतून तिने आपलं जीवन संपवल. या घटनेने बारामती परिसरामध्ये आता हळूहळू व्यक्त केली जातेय.
या घटनेनंतर दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विशाल गावडे. प्रवीण गावडे शुभम गावडे सुनील खोमणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये वडिलांनी ही संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे. या घटनेनंतर हे सर्व आरोपी फरार झाले असून वडगाव निंबाळकर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा अधिकचा तपास तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.