Type Here to Get Search Results !

बुधवारी 23 एप्रिल रोजी सिंचन भवन समोर सुप्रिया सुळेंच उपोषण.....

 गुरुवारी 23 एप्रिल रोजी सिंचन भवन समोर सुप्रिया सुळेंच उपोषण.....


 सोशल मीडियातून सुप्रिया सुळे यांनी केली उपोषणाची घोषणा.....




 नीरा दि. 21


बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला पुरंदर उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली यामुळे आक्रमक झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 23 एप्रिल पासून उपोषणाचा इशारा दिला आहे. 23 एप्रिल रोजी आपण सकाळी दहा वाजल्यापासून पुण्यात सिंचन भावन समोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी स्वतः सोशल मीडियातून घोषित केलंय.

पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील पंप स्टेशनवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी तीन वाजता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची  आणि पुरंदर मधील शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी एक आठवड्यापूर्वी नियोजन  करण्यात आले होते.मात्र या बैठकीला केवळ कार्यकारी अभियंता अशोक शेटे हेच उपस्थित राहिले.शिवाय त्या ठिकाणी कोणतीही बैठकीच्या दृष्टीने तयारी केली नव्हती एकूणच प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट सिंचन भवनासमोर उपोषणाची घोषणा केली आहे. 



   " हे सरकार खुर्ची सोडा सतरंजी देखील उपलब्ध करून देत नाही. अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आठ दिवसांपूर्वी माझ्या आजच्या बैठकीचे नियोजन केलं होतं. कार्यकर्त्यांनी तसं प्रशासनाला कळवलं होतं मात्र तरी देखील या ठिकाणी एक अधिकारी वगळता इतर कोणताही अधिकारी उपस्थित राहिला नाही. शिवाय या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने बसण्याची देखील व्यवस्था केली नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. एक प्रकारे अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. या संदर्भात आता बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आपण उपोषणाला बसणार असल्याचं सुळे यांनी घोषित केलंय.



  यापूर्वी देखील सुप्रिया सुळे यांनी  9 एप्रिल रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील 400 मीटर रस्त्याच्या प्रश्ना संदर्भात उपोषण करत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावेळी सुळे यांच्या उपोषणाची राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती.आता पुन्हा प्रशासनावर पाणी प्रश्नावरून नाराजी व्यक्त करत त्यांनी उपोषणाची घोषणा केली आहे.



.....

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies