Type Here to Get Search Results !

संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार हे निश्चित : करकर्ता मेळाव्यात घोषणा 22 तारखेला मुंबईमध्ये प्रवेश कार्यालयामध्ये करणार पक्षप्रवेश


 संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार हे निश्चित : करकर्ता मेळाव्यात घोषणा

22 तारखेला मुंबईमध्ये प्रवेश कार्यालयामध्ये करणार पक्षप्रवेश



  बारामती ( पुणे) 

   भोर वेल्हा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित केलय.. येत्या 22 तारखेला मुंबई येथे भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे... आज भोर येथे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पारपडला या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना संग्राम थोपटे यांनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट केलय. मात्र आपला पक्ष सोडण्याचा खापर त्यांनी काँग्रेसवरच फोडलय.... काँग्रेस मधून आपल्याला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता असा आरोप त्यांनी केलाय..


     गेली अनेक वर्षे काँग्रेस बरोबर एकनिष्ठ असलेलं भोर तालुक्यातील थोपटे कुटुंब आता काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते मानले जातात. माजी आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करण्यात सामना करावा लागल्यानंतर संग्राम थोपटे हे अस्वस्थ होते. ते भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होतं. मात्र तरी देखील मागील अनेक दिवसापासून ते काँग्रेसमध्ये होते. मात्र आता ते भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाला आहे. काल त्यांनी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. यासंदर्भात आज भोर येथे संग्राम थोपटे यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केलं होतं. भोर,राजगड मुळशी तालुक्याच्या विकासासाठी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत जाणे महत्त्वाच असल्याचा सूर या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांकडून लावण्यात आला. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी संग्राम थोपटे यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. यानंतर संग्राम थोपटे यांनी आपण भाजपमध्ये जात असल्याचे स्पष्ट केले.त्यापूर्वी त्यांनी राजगड आणि मुळशी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्याही भावना जाणून घेतल्या होत्या.


पक्ष सोडण्यासाठी काँग्रेस जबाबदार : संग्राम थोपटे 


पक्ष का सोडता या संदर्भात संग्राम थोपटे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेस मुळेच आली. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते म्हणाले की 1999 ते 2025 पर्यंत मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केलं. पक्ष पातळीवर काही अडचणी आहेत. त्या मांडण्याचा प्रयत्न केला. मी माझी भूमिका मांडली. त्या भूमिकेला पक्षपातळीवरून म्हणावा तसा प्रतिसाद मला मिळाला नाही.

असं एकदा दोनदा नव्हे तर अनेक वेळा घडल आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल देखील खच्ची झाल आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक खदखद होती की, तुम्ही पक्षाबरोबर राहण्याची भूमिका घेतात. मात्र पक्ष तुम्हाला पाहिजे असा प्रतिसाद देत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने ताकद द्यायला पाहिजे त्या पद्धतीने ताकद दिली जात नाही.

म्हणून नाईलाजाने भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आहे. असं म्हणत पक्ष सोडण्याच खापर संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षावरच फोडले आहे.

संग्राम थोपटे यांच्या बरोबर कोण कोण करणार भाजपमध्ये प्रवेश ?


संग्राम थोपटे यांच्या बरोबर भोर विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्याचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष, सेवादल, विद्यार्थी काँग्रेस यांचे अध्यक्ष , राजगड सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व संचालक त्याचबरोबर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, व्हाईसचेअरमन आणि संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व व्हाईसचेअरमन, त्यांच संचालक मंडळ, भोर शहरातील सर्व नगरसेवक आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक, त्याचबरोबर भोर शहरा व्यतिरिक्त विविध गावचे सरपंच, विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन,संचालक त्याचबरोब काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य असे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे.

राजगड साखर कारखान्याच्या अडचणी आहेत हे मान्य ...

संग्राम थोपटे यांना राजगड कारखानाच्या अडचणीच आहेत म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस ते म्हणाले की, राजगड कारखान्याच्या अडचणी आहेत का? तर आहे. राजगड कारखान्याला मंजुरी कोणी दिली ? तर ती महायुतीनेच दिली होती. महायुतीच्या काळामध्ये माझा एकमेव विरोधातला कारखाना असताना देखील मला कर्ज मंजूर झालं होतं. आता हे कर्ज नामंजूर केले नसून तेच स्थगित केलेले आहे. त्याचा वितरण थांबवलेलं आहे. त्याव्यतिरिक्त तालुक्यातील रखडलेली विकास कामे, सिंचनाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आणि पर्यटन विकास, या भागातील गड किल्ल्यांच संवर्धन, या तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करणे असेल,असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही हा प्रवेश करत असल्याचे संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies