विमानतळ बाधित शेतकऱ्यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच : बच्चू कडू यांची विमानतळात उडी
सासवड (प्रतिनिधी)
पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध वाढताना दिसत असतानाच आता माजी आमदार बच्चू कडू यांनी विमानतळातील बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा दिला असून 20 एप्रिल रोजी पुरंदर मध्ये जाहीर सभा घेणार आहेत.
विमानतळ बाधित असणाऱ्या शिष्टमंडळाने माजी आमदार बच्चू कडू यांचे भेट घेऊन सरकार शेतकऱ्यांवर कशा पद्धतीने अन्याय करीत आहे हे स्पष्ट केले शिष्टमंडळाने केलेल्या चर्चा नंतर बच्चू कडू यांनी बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू असे अस्वस्थ केले. 20 एप्रिल रोजी जाहीर सभा घेऊन असेही सांगितले
यावेळी प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, नामदेव कुंभारकर, किरण होले, सुनील कुंभारकर सुरेखा ढवळे, अमोल बोरावके, सुजित बोरावके, अमोल बनकर उपस्थित होते.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधत बाधीत शेतकऱ्यांचे आमरण उपोषणा मध्ये पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या गावांवर शासन जबरदस्तीने विमानतळ लादत आहे. शासनाने सर्वेक्षण भुसंपादन जबरदस्तीने सुरु केले आहे. या निषेधार्थ शेतकऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे
उपोषणाकडे राजकीय पक्षांची डोळेझाक
सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारती समोर विमानतळ बाधित शेतकरी उपोषणाला बसली असून या उपोषणाकडे पुरंदर तालुक्यातील राजकीय पक्षांनी डोळेझाक केली असून दुसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वगळता एकाही राजकीय पक्षाने हजेरी लावली नाही यामुळे बाधित शेतकऱ्यांनी मतदानासाठी गावात येणाऱ्या राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली.
"विमानतळ बाधित गावातील पर्यावरणाला बाधा पोहोचणार आहे. त्याचबरोबर बाधित शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहेत. या विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोधातून शासनाने काढलेले राजपत्राची होळी केली जाईल. हे भूसंपादन एमआयडीसी करत असली तरी या विमानतळावरून खाजगी विमाने जाणार आहेत. शासनाची कोणतीही विमाने या विमानतळावरून जाणार नाहीत."
माजीमंत्री बच्चू कडू