नीरा येथे रमजान ईद उत्साहात साजरी
मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत दिल्या शुभेच्छा
नीरा - ३१
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे सोमवारी (दि.३१) रोजी मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लहान थोरांनी एकत्र येत मोठ्या श्रध्देने सामुदायिकरीत्या नमाजपठन केले. त्याग, सदभावना आणि मनशुद्धी करणा-या रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा दिल्या. यावेळी हिंदू बांधवांनी देखील मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
नीरेतील स्टेशन मस्जिद येथे मौलाना हाफीज मेराज यांनी प्रवचन करीत हजरत मोहंम्मद पैगंबरांच्या आठवणींना उजाळा देऊन सामुदायिक नमाजपठन केले. तर हाजी हाफिज फत्तेहमोहंम्मद एज्युकेशनल ट्रस्टच्या ईदगाह मैदानात हाफिज मुज्जम्मिल तसेच अंजुमन तालीमुल कुरआन नीरा वार्ड नं.२ येथील मस्जिद मध्ये मौलाना.अमान उल्ला शेख यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आले. यावेळी नीरा व परिसरातील मुस्लीम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळी मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांच्या उन्नती, शांतता आणि एकात्मतेसाठी दुवा करण्यात आली. तसेच मोहंम्मद पैगंबर यांच्या शिकवणुकीला उजाळा देण्यात आला.
यावेळी स्टेशन मस्जिदमध्ये, उपसरपंच राजेश काकडे, नियोजन मंडळाचे सदस्य विराज काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण,समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण ,प्रमोद काकडे, नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार सोमनाथ पुजारी , सहाय्यक फौजदार राजेंद्र भापकर , दिपक काकडे, अमोल साबळे, योगेंद्र उर्फ आण्णा माने (भाजप,प्रचारक) , दादा गायकवाड,आदींनी रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
------------------------------------------------------------
नीरा येथे अंडर पासचे काम लवकरच होणार .
नीरा येथील स्टेशन मस्जिदमध्ये जाण्यासाठी लोकांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.त्यामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.याठिकाणी ओव्हर ब्रीज असावा अशी मागणी मुस्लिम बांधवांची अनेक वर्षापासून आहे. त्यासाठी आता अंडर पास पुलाठीचे एस्टिमेट तयार झाले आहे.लवकरच निधी मंजूर होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागणार असून येत्या वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण होईल आणि पुढील वर्षापर्यंत तो पुल कार्यान्वित होईल अस यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे यांनी यावेळी सांगितले