Type Here to Get Search Results !

"सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्यास समाजातील वातावरण बिघडते" : आ. दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुका पत्रकार संघाची एक दिवसीय कार्यशाळा मंचर येथे संपन्न : मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम

 "सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्यास समाजातील वातावरण बिघडते" : आ. दिलीप वळसे पाटील 


आंबेगाव तालुका पत्रकार संघाची एक दिवसीय कार्यशाळा मंचर येथे संपन्न : मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम 



आंबेगाव : 


      "दिवसेंदिवस युट्यूब चॅनेल व नव माध्यमांची संख्या वाढत चालली आहे. त्यांनी खातरजमा न करता बातमी देऊ नये. सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्यास समाजातील वातावरण बिघडते" असे मत माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.  आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथील जीवन मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या एक दिवसीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.


   मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित पुणे जिल्हा पत्रकार संघ व आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कर्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, टी.व्ही.9 मराठी चे संपादक उमेश कुमावत व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्तेदीप प्रज्वल्लाने झाले. 



     यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,  डी. के. वळसे पाटील, संतोष वळसे पाटील, निलेश कान्नव, यांच्यासह आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या उपस्थित होते. 



"पत्रकारांनी कोणत्याही एका विचारला प्राधान्य न देता तटस्थ पत्रकारिता केली तरच पत्रकारितेला भविष्य आहे. अन्यथा पत्रकारितेला अनेक पर्याय उपलब्ध होतील. पत्रकारांनी बदलत्या काळानुसार नव तंत्रज्ञान आत्मसात करावे." असे मत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी व्यक्त केली. 


कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त देशमुख म्हणाले, "पत्रकारांची पेन्शन, पत्रकार भवन व पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा." 



     "पत्रकारांनी काम करताना विश्वासअहर्तता टिकवून काळानुरूप बदलले पाहिजे. ग्रामीण भागातील पत्रकारांनी जोडव्यवसाय करावा असे टी.व्ही.9 मराठी चे संपादक उमेश कुमावत यांनी सांगितले. 


यावेळी उल्लेखनीय क्षेत्रात काम केलेले प्रदीप देसाई, प्रशांत कडूसकर, उदय ढगे, भरत भोर, संदीप एरंडे, निलेश थोरात, दत्ता गांजाळे, पांडुरंग निघोट, अजय घुले, रत्ना गाडे, संजय थोरात या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. 



   कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्राप्रमाणे पत्रकारितेतही क्रांती करणार आहे. पत्रकारिता क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर करून कार्यक्षमता वाढविण्याच्या संधी आहेत असे मत शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

    


      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे, निलेश पडवळ यांनी केले. अशी माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघ प्रवक्ता सावता झोडगे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies