"तुमचे पैसे रोडवर पडलेत" म्हणत बॅकेतून काढलेल्या रक्कमेवर डल्ला.
नीरेतील पि.डी.सी.सी. बॅंके समोरुन आठवड्यात दुसऱ्यांदा चोरी.
पुरंदर :
राख येथील पोल्ट्री व्यावसायिकांने बॅकेतून काढलेल्या कर्जाच्या रक्कमेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. "तुमचे पैसे रोडवर पडलेत" म्हणत लक्ष विचलीत करुन, मोटारसायकलच्या हँडलला लावलेली प्लॅस्टिक पिशवी चोरट्यांनी लंपास केली आहे. या पिशवीत बॅकेतून काढलेले १ लाख रुपये, व्यावसायाचा रबरी शिक्का, बॅंकेचे चकबूक ठेवलेले होते. याबाबतची फिर्याद चंद्रकात बाबासो पवार वय ५०, व्यावसाय शेती रा. राख ता. पुरंदर जिल्हा पुणे यांनी नीरा पोलीस दुरक्षेत्रात दाखल केली आहे.
नीरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राख येथील चंद्रकात पवार यांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून पोल्ट्रीशेड तयार करण्यासाठी कर्ज प्रकरण केले होते. त्याची रक्कम नीरा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील खात्यात जमा झाले होते. ती रक्कम काढण्यासाठी पवार सोमवारी (दि.१७) दुपारी १२:४० च्या सुमारास आले होते. १ लाख रुपये रोख रक्कम बॅंक खात्यातून काढल्यावर ती रक्कम, व्यावसायाचा रबरी शिक्का, बॅंकेचे चेकबुक निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले होते. बॅकेतून बाहेर आल्यावर नीरा बारामती रस्त्यावर लावलेल्या बजाज प्लॅटीन मोटारसायकल क्र. एम. एच. १२ / एफ.एल. ४७७९ च्या हॅन्डेलला लावली व ते मोटरसायकल वरती जावु लागलो तेंव्हा पवार यांना एक अज्ञत इसमाने तुमचे पैसे रोडवर पडले आहेत, असे सांगीतले. त्यांना पैसे रोडवर पडलेले दिसले. म्हणून त्यांनी १ लाख रुपयांची हॅडेलला लावलेली पिशवी सह मोटरसायकल स्टॅण्डवर लावून, रस्त्यावर पडलेले पैसे गोळा केले. पवार यांनी रस्त्यावरील पडलेले पैसे गोळा करून पुन्हा आपल्या मोटारसायकलकडे आले असता मोटारसायकलच्या हँडलला लावलेली एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी दिसून आली नाही. त्यामुळे बॅंक परिसरात पिशवीचा शोध घेतला पण रक्कम असलेली पिशवी आढळून आली नाही. त्यामुळे पवार यांची खात्री झाली की आपली १ लाख रुपये रोख रक्कम, रबरी शिक्का व चेकबुक असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लक्ष विचलीत करुन चोरुन नेली आहे. या घटनेची पवार यांनी तात्काळ नीरा पोलीसांत तक्रार दाखल केली असुन, नीरा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार रविराज चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
नीरेच्या भरबाजारपेठेत आठवड्यात ही चोरीची दुसरी घटना घडली आहे. मागील आठवड्यात गुळूंचे येथील एकाची मोटारसायकलला लावलेली रोख रक्कमेची पिशवी चोरट्यांनी लंपास केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्याच बॅंकेसमोर पुन्हा तशीच घटना घडल्याने बॅंकच्या खातेदारांनमध्ये भिती निर्माण झाली आहे. आता मार्च अखेर सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर रक्कमा बॅंकेत भरतात किंवा काढत असतात. अशा चोरीच्या घटना वाढत राहिल्यास लोकांनी व्यवहार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झा
ला आहे.