आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा
दैनिकांच्या संपादकासह मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख करणार मार्गदर्शन
पुणे :
आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा मंचर (ता. आंबेगाव) येथे जीवन मंगल कार्यालयात रविवारी (ता. २३) आयोजित केली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघ प्रवक्ता सावता झोडगे व जिल्हा समन्वयक रविंद्र वाळके पत्रकार यांनी दिली.
पहिल्या सत्रात 'सकाळ'चे मुख्य संपादक नीलेश खरे, 'टीव्ही 9 मराठी'चे संपादक उमेश कुमावत, 'लोकमत'चे संपादक संजय आवटे, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, प्रांत गोविंद शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे व पत्रकार डी. के. वळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या समारोप सत्रात दुपारी दोन वाजता 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस मार्गदर्शन करणार असून, 'म्हाडा'चे पुणे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अड. स्वप्नील ढमढेरे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होईल. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेले अधिकारी व मान्यवरांचा सन्मान केला जाईल.