पाच दिवसांपासून जनावर नीरा डाव्या कालव्यात अडकले.
वाहत्या पाण्यात मृत जनावर कुजलेल्या अवस्थेत, प्रदूषित पाणी वाहते.
पुरंदर :
नीरा पाटबंधारे विभागाचा भोंगळा कारभार समोर येत आहे. गेली पाच दिवस नीरा डाव्या कालव्यामध्ये एक जनावर अडकून पडले आहे. ते आता पोकळेवस्ती येथे अडकले असल्याचे समजते. यामुळे वाहत्या पाण्यामध्ये धोकेदायक जिवाणू जात आहेत. याबाबत मागील पाच दिवसांपूर्वी सोशल मिडियातून या पाण्यात अडकलेल्या जनावराचा फोटो व्हायरल झाले होते. ते आजही कुजलेल्या अवस्थेत असून कालव्याचे वाहते पाणी प्रदूषित होत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी येते असून, स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होत आहे.
नीरा डाव्या कालव्याच्या पिंपरे थोपटेवाडी हद्दीत हे जनावर पाण्यात ढकल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. पुथेनिरा शिवतक्रार हद्दीतील एक लोखंडी पाईप लाईन मध्ये ते मृत जनावर अडकले. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी नीरा शिवतक्रार पासून खालील गावांनी हे पाणी पिऊ नये असा इशारा देण्यात आला. आत हे जनावर नीरा गवातील पोकळेवस्ती हद्दीतील नीरा डाव्या कालव्यात अडकलेल्या अवस्थेत आहे. मात्र पाटबंधारे विभागाने याची कुठलीही दखल घेतल्याचे दिसून येत नाही. हे जनावर आज पाच दिवसानंतर ही जनावरं कुजलेले अवस्थेत नीरा डाव्या कालव्यात अडकून पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे नीरा डाव्या कालव्या वरील पाण्याचे स्त्रोत दुषीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नीरा पाटबंधारे विभागाकडून मागील काळात कालव्यावर बारकाईने लक्ष ठेवत असत. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी काही करामती केल्यास धडक कारवाई करत. आता मात्र वर्षांनूवर्ष पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अधिकारी कालव्यावर फिरकत नाहीत. परिणामी कालव्यावर प्रचंड प्रमाणात प्रदुषण, केलं कचरा पडत आहे. काटेरी झुडपे वाढत आहेत. आता तर गेली पाच दिवसांपासून जनावर अडकून पडले तर ते पाण्याबाहेर कोणी काढायचे हा प्रश्न निर्माण करत पाटबंधारे विभाग हात झटकताना दिसतं आहेत.