Type Here to Get Search Results !

बारामती नगर परिषदेचा नगररचना अधिकारी लाच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

 बारामती नगर परिषदेचा नगररचना अधिकारी लाच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..


एक लाख रुपयाची लाच घेताना विकास ढेकळे याला पकडले रंगेहाथ...





   बारामती 

           बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला फाईलवर सही करण्यासाठी पावणे दोन लाख रुपयाची मागणी करणाऱ्या बारामती नगर परिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी रंगे हात पडले आहे.एका जिम मध्ये एक लाख रुपये स्वीकारताना हा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडला आहे.

        विकास ढेकळे असे या नगररचना अधिकाऱ्याचे नाव आहे. बारामती नगर परिषदेमध्ये तो नगर रचना अधिकारी म्हणून काम करतो. बारामतीतील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची एक फाईल बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागात प्रलंबित होती. या फाईलवर सही करण्यासाठी नगररचना विभागाचा अधिकारी विकास ढेकळे यांने पावणे दोन लाख रुपयाची लाच मागितली होती. या अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासामुळे संबंधित बांधकाम व्यवसायकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रार ची शहानिशा केली. त्याला पकडण्यासाठी यंत्रांना कार्यान्वित झाली. या अधिकाऱ्याने तडजोडी अंती एक लाख रुपये घेऊन फाईल वर सही करण्याची तयारी दर्शवली होती.त्यानुसार बुधवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत विकास ढेकळे याला बारामती शहरातील एका जिम मध्ये एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. यामुळे बारामती नगरपरिषदेसह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विकास ढेकळे याच्यावर बुधवारी रात्री उशिरा बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ

हे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies