मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन शेगांव नगरित : एस.एम. देशमुख.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची नांदेड येथील बैठकीत निर्णय.
बैठकीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचे सुतोवाच.
नांदेड :
"अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन संत गजानन महाराजांच्या शेगांव नगरित होत असुन ते ऑगस्ट महिन्यात होणार आहे. यावर्षीही परिषेदेच्या नावाला शोभेल असे भव्यदिव्य अधिवेशन पार पडण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे" असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.
रविवारी (दि.१०६) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विभागनिहाय कार्यकारिणी बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीचे नियोजन नांदेड जिल्हा पत्रकार संघाने बैठकीचे आयोजन मंत्रिमंडळ बैठक किंबहुना एखादया उच दर्जाच्या कंपनीच्या बैठकी प्रमाणे कॉर्पोरेट पद्धतीने करण्यात आले होते. या बैठकीत अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख होते. विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या सह कार्यकारिणीतील मुख्य पदाधिकारी, उपाद्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हादयक्ष, परिषद प्रतिनिधी, अधिस्वीकृती समिती सदस्य, डिजिटल मीडिया व महिला आघाडी सह राज्यभरातून २७ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व पदाधिकारी यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम पुस्तक, भरजारी शाल आणि मोत्याचे हार घालून तसेच इतर सदस्यांना मानाची शाल देऊन सन्मानित केले. तर उज्वला व त्रिरत्न भवरे यांच्या हस्ते उपस्थितांना संविधान प्रत भेट देण्यात आली.
या बेठकीची सुरवात राज्या गिताने झाली. विजय जोशी यांनी महाराष्ट्र राज्याचे गीत गाऊन बैठकीत ऊर्जा निर्माण केली. बैठकीचे प्रास्ताविक व स्वागत नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केले. सभेचे इतिवृत्त वाचन व सुत्रसंचलन मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी केले. परिषदेचा कारभार चालतो तो वार्षिक वर्गणीवर याबाबत जिल्हा संघांच्या अध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व उपस्थित जिल्हा अध्यक्षांनी पुढील महिनाभरात वार्षीक वर्गणी जमा करण्याचे सांगितले. जिल्हा संघांच्या निवडणूका या परिषदेचे घटनेप्रमाणे दर दोन वर्षांनी होणे क्रमप्राप्त आहे. या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे. तसेच परिषदेचा कारभार पुढे चालवण्यासाठी अशा २५ तरुण नवे चेहरे पुढे येणे गरजेचे आहे असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
पत्रकार पेन्शन योजनेतून अनेक पत्रकार वंचित आहेत. ही योजना पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी नसुन ती कशी मिळणार नाही अशा जाचक अटी त्यात आहेत. याबाबत परिषद ठोस निर्णयावर आली आहे. तर ही योजना पत्रकार पेन्शन योजना नसून ती पत्रकार सन्मान योजना असल्याचे मत अधिस्वीकृती समितीचे मुंबई अध्यक्ष दिपक कैतकै यांनी मत मांडले.
पत्रकार पेन्शन योजनेतून गरजू पत्रकारांना निवृत्तीनंतर दोन पैशांची मदत व्हावी या हेतूने परिषद गेली २५ वर्षांपासून लढा देत आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. यावर सविस्तर चर्चा झाली. पेन्शन योजना, पत्रकारांवरील हल्ले, खोटे गुन्हे दाखल होणे, डिजिटल मिडिया मधिल पत्रकारांच्या युट्यूब व वेब पोर्टलला शासनाच्या जाहिराती मिळाव्यात अशी विविध मागण्यांसाठी एक राज्यव्यापी आंदोलन छेडून मुंबईत एस.एम. देशमुखांच्या नेतृत्व महामोर्चाचे आयोजन पुढील काळात करण्याचे सुतोवाच परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी दिले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे द्विवार्षीक राष्ट्रीय अधिवेशन ही महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी एक पर्वणी असते. हे अधिवेशन कोणता जिल्हा पार पाडेल याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने संत गजानन महाराजांच्या शेगांव नगरित हे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे शिवधनुष्य उचलले. याला परिषदेच्या कार्यकारणीतील सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.
डिजिटल मिडिया परिषदेच्या विस्ताराबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली. डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी आतापर्यंत १५ जिल्ह्यात कार्यकारिणी अस्तित्वात आल्या आहेत त्याची माहिती दिली. उर्वरित जिल्ह्यांत लवकरच अध्यक्ष व कार्यकारिणी अस्तित्वात येतील असे आश्वासन दिले.
साप्ताहिक व जिल्हास्तरावरील दैनिकांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली. परिषदेचे आगामी काळातील महत्वपूर्ण ध्येय धोरण एस. एम. देशमुख यांनी जाहीर केले तसेच उपस्थित पदाधिकारी यांच्या सूचनांची नोंद घेऊन परिषदेची वाटचाल ठरवण्यात आली. बैठकीला परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, सरचिटणीस प्रा सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडीयाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष गो.पी. लांडगे, विजय जोशी आदिंनी चर्चेत सहभागी होत, महत्वाच्या सुचेना मांडल्या. बैठकीला परिषदेचे शंभरहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत उपस्थित राहणाऱ्यांचे आभार प्रकाश कांबळे यांनी मानले. तर कार्यकारिणीची पुढिल बैठक १७ में २०२५ रोजी सिंधुदुर्ग येथे होणार असल्याचेही ठरले.