वाळुंजच्या पोलीस पाटलांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून सन्मान
चांगल्या कामाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन केला सन्मान
नीरा दि.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाळूज गावच्या पोलीस पाटलांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते पोलीस पाटील मोहन इंगळे यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इंगळे यांनी गावतील कायदा सुव्यवस्था राखत पोलीस प्रशासनास वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागामध्ये गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस पाटलांना करावा लागते. त्याचबरोबर अडचणीच्या काळामध्ये पोलीस, महसूल, वन आणि आरोग्य खात्याला देखील पोलीस पाटलांना मदत करावी लागते. वाळुंज येथील पोलीस पाटील मोहन इंगळे यांनी गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य करून चांगले काम केले. त्याच्या या मकामाच कौतुक पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले. त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरवण्यात आला.बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील पोलीस मुख्यालयामध्ये राज्यातील पोलीस पाटलांचा मेळावा पारपडला.यावेळी राज्यातून आलेल्या आणि चांगले काम केलेल्या वेगवेगळ्या तालुक्यातील पोलीस पाटलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पंकज देशमुख साहेब (भा.पो.से) ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, गणेश बिरादार , तानाजी बरडे (भोर उपविभागीय अधिकारी), दिपक वाकचौरे (जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी) अण्णासाहेब देशमुख (सहाय्यक पोलीस निरीक्षक) महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, खजिनदार श्री.निळकंठ थोरात पाटील, कार्याध्यक्ष श्री. विजय कुंजीर पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्ष मोनिकाताई कचरे पाटील, हवेली अध्यक्ष विजय टिळेकर पाटील, पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस पाटील पदाधिकारी उपस्थित होते.