बँकेत सहा महिने आर्थिक व्यवहार नाही : खात्यांचे केवायसी करून घ्या
महाराष्ट्र बँकेचे ग्राहकांना आवाहन
पुरंदर :
रिझर्व बँकेच्या धोरणानुसार सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आर्थिक व्यवहार न झालेल्या खात्यातील पैसे हे अशी खाती बंद करून रिझर्व बँकेकडे जमा केले जातील. त्यासाठी अशा खात्यावर व्यवहार करून पुन्हा केवायसी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांनी बँकेत येऊन केवायसी पूर्ण करावी असे आवाहन नीरा येथील बँकेचे ऑफ महाराष्ट्रचे शाखा अधिकारी रोहित चव्हाण यांनी केले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र बँकेमध्ये अनेक लोकांनी बचत खाते आणि इतर खाती सुरू केली आहेत.अशा खात्यांमधून मागील सहा महिन्यांपासून कोणतेही व्यवहार करण्यात आले नाहीत. त्यामुळे अशी खाती रिझर्व बँकेच्या धोरणानुसार बंद केली जाऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या लोकांची वापरात नसलेली खाती असतील. त्या सर्व लोकांनी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी आर्थिक देवाण-घेवाण केली नसेल तर पुन्हा एकदा केवायसी करून घेणे गरजेचे आहे. या संदर्भात रिझर्व बँकेने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे अशा खातेदारांनी बँकेमध्ये येऊन केवायसी करावी. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक पुरावा जमा करावा. त्याचबरोबर अशा खात्यांवर आर्थिक देवाण-घेवाण करावी अन्यथा असे खाते बंद खाते म्हणून संबोधले जाईल. यानंतर त्यातील रक्कम रिझर्व बँकेकडे ट्रान्सफर केली जाऊ शकते असं शाखाधिकारी रोहित चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर केवायसी करून घेण्याच्या आवाहन चव्हाण यांनी केले आहे.