पिंपरे हद्दीत दुचाकीस्वाराने टँकरला धडक.
जेऊर येथील एक जखमी : पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील घटना
पुरंदर :
पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा नजीकच्या पिंपरी येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात चाललेला दुचाकीस्वाराने टँकरला मागून जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.
पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील अपघातांचे क्षेत्र असलेल्या पिंपरे (खुर्द) हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहा समोर दुचाकी क्र.एम.एच. १२- जी.एक्स- ९४४१ व टँकर क्र.एम.एच.४३-बी.एक्स- ८२३४ यांचा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नीरा येथून जेऊर येथील एक दुचाकीस्वार वेगात वाल्हे बाजूकडे चालला होता. याच दरम्यान एक टँकर एचपी पंपाच्या शेजारील वाशिंग सेंटर कडे दिम्या गतीने वळत असताना मागून येणाऱ्या दुचाकी स्वराने टँकरला मागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून जेऊर येथील दुचाकी स्वार जखमी होऊन त्याचा उजवा पाय निकामी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.