नैमित्तिक रिक्त संचालक पदासाठी मतदान कोण करणार ?
सोमेश्वर सह.साखर कारखान्या निवड प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह.
पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नैमित्तिक रिक्त संचालक पद भरण्याची संचालक मंडळाची सभा व निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धीस देण्यात आला आहे. मात्र या नैमित्तिक रिक्त संचालक पदासाठी मतदान कोण करणार आहे. त्याबाबत जाहिरातीत संदिग्धता दिसून येत असून, ते पद तर सर्व सभासदांनी मतदान करुन निवडलेले आहे. आता या पदाच्या निवडणुकीत कोण मतदार असणार आहेत. याबाबत संबंधित यंत्रणेने खुलासा करावा अशी विनंती सभासदांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे या सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की, आपल्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातील / मतदार संघ क्र. ३ मधील संचालक निवडीकरिता अध्यासी अधिकारी, मा. श्री. प्रमोद दुरगुडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४-०२-२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राजमाता जिजाऊ सभागृह, कारखाना मुख्य कार्यालयीन इमारत, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे या ठिकाणी संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सभेत नैमित्तिकपणे रिक्त झालेले पद निवडीसाठी खालील निवडणूक कार्यक्रमानुसार कामकाज करण्यात येणार आहे. तरी सदर सभेची व खालील निवडणूक कार्यक्रमाची नोंद घ्यावी. निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रकानुसार जाहिरात दैनिकांत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
या जाहिरातीत सदर निवडणुकीत मतदानाचा हक्क कोणाला असणार आहे या बाबत उलटं सुटलं चर्चांना उधाण आ
ले आहे.