वीरच्या देवाला अलंकारिक पोशाख, शृंगारिक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
आज माघ वद्य अमावस्येनिमित्त श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. सकाळपासूनच देवस्थान ट्रस्टमार्फत/भाविकांमार्फत देवाला अभिषेक करण्यात आले सकाळी १० वाजता भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळ वाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळीचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर चालू होता.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र वीर व प्रशासनाच्या सहकार्याने यंदाचा यात्रा उत्सव उत्साही व शांततापूर्ण वातावरणात पार पडला. देवस्थान ट्रस्ट मार्फत यात्रेनंतरची साफसफाई मंदिर परिसरातील घाण/कचरा उचलण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत गावामध्ये, बाजारतळे, पालखी तळे, सर्व मंदिरे परिसर, यांची स्वच्छता करण्यात येत आहे. ट्रस्टचे विश्वस्त स्वतः उभे राहून सर्व यंत्रणा राबवून गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन सफाई करून घेत असल्याचे निदर्शनास आले.
संपूर्ण यात्रा उत्सव, महाशिवरात्री, अमावास्या याकाळात म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र वीर व प्रशासनाच्या सहकार्याने यंदाचा यात्रा उत्सव उत्साही व शांततापूर्ण वातावरणात पार पडला असून देवस्थान ट्रस्टने सर्वांचे आभार मानले आहे.
आजच्या अमावस्येला श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी उत्सव मूर्तींना पोशाख परिधान करून अलंकारांनी सजवण्यात आले होते. यात्रोत्सवानंतर देवाला साज घालून यात्रेचा सीन उतरवला जातो. अलंकारिक स्वरूपातील देवाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
यंदाचा यात्रा उत्सव २०२५ पाद पाडण्यासाठी मा. अजितदादा पवार साहेब, मा. ना. विजयबापू शिवतारे, मा. जिल्हाधिकारीसो, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार , वीज वितरण विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पीएमपीएमएल, पुणे, महसूल विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा परिषद पंचायत समिती, आरोग्य विभाग, सासवड जेजुरी नगरपरिषद, ग्रामपंचायत वीर, ग्रामसेवक, मंडलाधिकारी, तलाठी, यांचे अधिकारी व कर्मचारी सर्वांचे देवस्थान ट्रस्टमार्फत आभार मानण्यात आले.
यावेळी यात्रा उत्सवात आकर्षक फुलांची सजावट माजी विश्वस्त दिलीप दादा धुमाळ व मित्र परिवार यांचेमार्फत करण्यात आले. तसेच आकर्षक विद्युत रोषणाईसाठी कैलास औसक, बडदे, डी.एस. लाईट, पुणे, एस.आर.लाईट, नितीन शेंडकर पुणे, कुंडलिक कांदळकर,जोगेश्वर,शिवशक्ती,स्पार्क,एस.के,साम्राज्य लाईट यांचेमार्फत करण्यात आले. तसेच मिथुन धुमाळ यांनी याकामी सहकार्य केले. फटाक्यांची आतिषबाजी स्वप्नील हरकळ (विघ्नहर्ता डेकोरेटर्स, पुणे) व विकास शिंगाडे, प्रशांत साळुंखे, अभिषेक रोमन यांनी केली. जनरेटर सुविधा राहुल वाल्हेकर यांनी नियोजित केली. कुस्तीसाठी सल्लागार श्री. संग्राम धुमाळ, मंगेश धुमाळ व सहकारी यांनी मदत केली. गावातील गणेश मंडळे यांनी श्रीनाथ सेवेकरी म्हणून देवस्थानला सहकार्य केले. तसेच वेंकीज उद्योग समूहाचे बालाजी राव सर यांचेमार्फत हाउसकीपिंग स्टाफ (अर्चना पाटील व सहकारी), देवस्थानचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
सर्व दागीनदार, सालकरी, मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरातील यात्राकालातील सर्व विधी परंपरेने करण्यात आले.यावेळी ट्रस्टचे चेअरमन श्री. राजेंद्र धुमाळ ,व्हा. चेअरमन अमोल धुमाळ, विश्वस्त श्री. सुनील धुमाळ, विराज धुमाळ, काशिनाथ धुमाळ, अमोल धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासाहेब समगिर, जयवंत सोनवणे, सौ. प्रमिला देशमुख, अलका जाधव, सल्लागार श्री. रामचंद्र धुमाळ, तानाजी धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, संग्राम धुमाळ, मनोज धुमाळ, पदाधिकारी, ग्रामस्थ इ. मंडळींनी ट्रस्टतर्फे व्यवस्था पहिली.