Type Here to Get Search Results !

श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांचा पारंपारिक विवाह सोहळा संपन्न

 !! श्रीनाथ म्हस्कोबा प्रसन्न !!

     श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांचा पारंपारिक विवाह  सोहळा संपन्न 



   नीरा दि.१२

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी यांच्या श्रीक्षेत्र वीर नगरीत महाराष्ट्रातील नामांकित/प्रसिद्ध असणारी यात्रा  पार पडते आहे... या यात्रे निमित्त आज श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वर यांचा विवाह सोहळा पार पडलामं.

     गळवार दिनांक ११/०२/२०२५ रोजी पहाटे ५.०० व पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर ६ वा. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला व सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १०.३० वा. देवाला दही- भाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी १२ वा. धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मि. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. 



  देवाचा लग्नसोहळानिमित्त मंदिरात फुलांची विविध प्रकारची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यासाठी दिलीप जयसिंगराव धुमाळ (माजी विश्वस्त) व मित्र परिवार यांचेमार्फत नियोजन करण्यात आले. श्रीक्षेत्र कोडीतची काठी-पालखी घेऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सायंकाळी ७.४५ मि. श्रीक्षेत्र वीर येथे आली. यावेळी देवाची धुपारती घेऊन मुकादम-पाटील, विश्वस्त, मानकरी, दागीनदार, सालकरी, ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटाभेट होऊन वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. त्यानंतर काठी-पालखी तळावर स्थानापन्न झाली. रात्रौ. ११.०० वा. समस्त राऊत मंडळीच्या वतीने देवाला पोशाख करून देव-देवतांना विवाह सोहळ्यासाठी आवाहन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीत उत्सवमूर्ती ठेऊन ढोल-ताश्याच्या गजरात तसेच कोडीतची पालखी बाहेरून अंधारचिंच येथे गेल्या. त्यावेळी मानकं-यांना (शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण) फुलाच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कण्हेरी पालख्यासह काठ्यांची भेटाभेट होऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या. एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्री. चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम-पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्रो २.४५ वा. लग्नविधीला सुरुवात होऊन मुकादम पाटील, पुरोहीत, गुरव, माळकरी यांच्या गाभाऱ्यातील उपस्थितीत मंगलाष्टके होऊन २.५५ वाजता लग्नसोहळा संपन्न झाला. मादिराबाहेरील लाखो भाविकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा संपन्न झाला. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला यावेळी आकर्षक फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. 

यावेळी आकर्षक विद्युत रोषणाईसाठी कैलास औसक, बडदे, डी.एस. लाईट, पुणे, एस.आर.लाईट, नितीन शेंडकर पुणे, कुंडलिक कांदळकर, एस.आर.लाईट, जोगेश्वर,शिवशक्ती,स्पार्क,एस.के,साम्राज्य लाईट यांचेमार्फत करण्यात आले.तसेच मिथुन धुमाळ यांनी याकामी सहकार्य केले. फटाक्यांची आतिषबाजी स्वप्नील हरकळ (विघ्नहर्ता डेकोरेटर्स, पुणे) व विकास शिंगाडे, प्रशांत साळुंखे यांनी केली. जनरेटर सुविधा राहुल वाल्हेकर यांनी नियोजित केली. यावेळी पुरोहित दीपक थिटे, संतोष थिटे, नंदकुमार थिटे, श्रीकांत थिटे, किशोर थिटे यांनी पौराहित्य केले. लग्न विधीनंतर सर्व काठ्या-पालख्या ग्राम प्रदक्षिणेसाठी गेल्या.   

 वीर गावचे मुकदम पाटील सोबत सर्व दागीनदार, सालकरी, मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरातील विधी करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे चेअरमन श्री. राजेंद्र धुमाळ ,व्हा. चेअरमन अमोल धुमाळ, विश्वस्त श्री. सुनील धुमाळ, विराज धुमाळ, काशिनाथ धुमाळ, अमोल धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासाहेब समगिर, जयवंत सोनवणे, सौ. प्रमिला देशमुख, अलका जाधव, सल्लागार इ. मंडळींनी ट्रस्ट तर्फे व्यवस्था पहिली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies