Type Here to Get Search Results !

श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेञ कोडीत वरून श्रीक्षेञ वीर कडे प्रस्थान

 श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेञ कोडीत वरून श्रीक्षेञ वीर कडे प्रस्थान





पुरंदर दि. ११ 

श्री नाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर येथील भक्त तुळाजीबुवा मंदिरापासून ठिक १२.१५ वाजण्याच्या सुमारास श्रीक्षेञ वीर (ता.पुरंदर ) येथील विवाह सोहळ्यासाठी माघ पौर्णिमा मंगळवार दि .११ फेब्रुवारी रोजी शाही दिमाखात प्रस्थान झाले.

        श्रीक्षेत्र कोडीत येथे शुक्रवारी पहाटे उत्सव मूर्तीना अभिषेक घालण्यात आला. ढोल ताशांच्या व पारंपारीक वाद्याच्या गजरात मानाच्या काठीसह छत्री ,अब्दागिरी ,चव-या ढाळत देउळवाड्यातून जवळ असणा-या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे परम भक्त असलेल्या तुळाजी मंदिरात पालखी विसावली. पालखीसह सर्व लवाजमा विसावल्यावर उपस्थित श्रीनाथभक्तांनी 'सवाई सर्ज्याचं चांगभल 'चा जयघोष केला.यामुळे संपुर्ण श्रीक्षेञ कोडीतनगरी दुमदुमून गेली. 

      मंगळवार दि.११ रोजी पहाटे ५ वाजता उत्सव मूर्तीना महारुद्र अभिषेक घालुन उत्सव मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. त्या नंतर हजारो भाविकांनी उत्सव मूर्तींचे दर्शन घेतले.दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेऊन हजारो भाविक पायी अनवाणी वीर कडे पारंपारीक वाटेने चालत निघाले.



     दुपारी ११.३० वाजण्याच्या अगोदर सर्वांची लगबग सुरु झाली .पालखी जवळ मानकरी, सालकरी, अब्दागिरी, छत्र निशाण घेऊन मानकरी उभे होते .ठिक १२.१५ वाजता तुतारी वाजली व मानक-यांनी श्रीनाथ म्हसोबा महाराजांच्या पालखीला खांदा लावला. ढोलताशांचा गजर ,पारंपारीक वाद्याचा गजर सालकरी ,मानकरी ,ग्रामस्थ व हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीनाथांच्या पालखीचे श्रीक्षेञ वीरकडे शाही प्रस्थान सुरु झाले .या पालखी पुढे मानाची काठी पालखी समवेत दागदागीनदार अब्दागिरी चव-या ढाळत हजारो भाविकांच्या उपस्थित अक्षता झेलीत धिम्यागतीने पालखीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. पालखी नदी पलीकडे गेल्यावर नागदरी या ठिकाणी पारंपारिक मेंढ्याचे रिंगण वाद्याच्या गजरात पार पडले.पिंपळे ते वीर अशा पालखीमार्गावर रांगोळी कलावंतांनी रांगोळ्या काढल्या.

     श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भिवडी,सुपे, पिंपळे,पांगारे घाट मार्गे परिंचे गावारून पालखी राउतवाडी येथे विसावेल.सायंकाळी पालखी वीर येथे पोहचल्यानंतर सर्व मानकरी स्वागत करतात.राञी १२ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होईल.

     

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies