Type Here to Get Search Results !

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे येथून अपहरण

 माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे येथून अपहरण

 गोळीबार, धमकी आणि नंतर अपहरण, सावंत कुटुंब टार्गेट 



धाराशिव - 


राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचे अपहरण झाले असुन या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऋषीराज सावंत याचे पुणे विमानतळावरून अपहरण करण्यात आले आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी प्राथमिक माहिती असुन पोलिस याचा शोध घेत आहेत. स्वीफ्ट गाडीतून चार लोक उतरले आणि त्यांनी तानाजीराव सावंत यांच्या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे तपास सुरू केला आहे. सावंत यांना गिरीराज व ऋषीराज अशी 2 मुले आहेत. 


गेल्या काही महिन्यापासुन सावंत कुटुंब हे टार्गेटवर असल्याचे काही घटनावरून समोर आले आहे. सावंत यांचे पुतणे धनंजय यांच्या घरासमोर गोळीबार त्यानंतर धमकी व आता अपहरण अशी घटना घडली आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय व केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते याप्रकरणी ढोकी पोलिसात 23 डिसेंबर 24 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. केशव सावंत व धनु सावंत तुमचा पण संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल असे या पत्रात नमुद केले करीत त्या पत्रासोबत 100 रुपयाची नोट देखील जोडली होती. पत्रातील मजकूर हा पेन्सिलने स्केच करुन लिहला होता. यापुर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती त्यात गुन्हा नोंद करण्यात होता मात्र या गुन्हाची उकल अद्याप झालेली नाही, विशेष म्हणजे यात उपविभागीय अधिकारी यांची एसआयटी पथक स्थापन केले आहे. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर 13 सप्टेंबर 24 रोजी मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात इसमानी दुचाकीवर येऊन 4 राऊंड फायर केले होते त्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेते हे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येण्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती, मुख्यमंत्री व इतर नेते येणार असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असतानाही हा गोळीबार झाला मात्र अद्याप गुन्हेगार अटक नाही.

गोळीबाराच्या घटनेतून आम्ही बाहेर पडत असतानाच हे धमकीचे पत्र आल्याने आमच्या जीवाला धोका आहे. पोलिसांना याबाबत तक्रार देऊनही गोळीबार प्रकरणाचा छडा लावला नाही त्यानंतर आता धमकी पत्र आले आहे त्याचा तपास करावा अशी मागणी सावंत यांनी केली होती.

  ब्रेकिंग अपडेट

दरम्यान तानाजी सवांत यांचा मुलगा विमाने  बँकॉकला गेल्याचे उघड झाले आहे. त्याचे विमान परत बोलून त्याला रात्री उशिरा पुण्यात माघारी आणण्यात आले आहे. यासाठी त्याला पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मदत केली आहे त्यामुळे हे अपहरण नाट्य आता संपले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies