Type Here to Get Search Results !

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २८ डिसेंबर रोजी खानवडीत होणार : दशऱथ यादव यांची माहिती

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २८ डिसेंबर रोजी खानवडीत होणार : दशऱथ यादव यांची माहिती




पुरंदर : सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे, उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.


संमेलनाच्या संयोजन बैठकीला राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, दत्ता कड, अरविंद जगताप, दीपक पवार, संजय सोनवणे, आदी उपस्थित होते.


महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी होतात. कऱ्हा नदीच्या काठावर रंगणा-या या साहित्य संमेलनात  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखक, कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies