Type Here to Get Search Results !

आदर्श तालुका पत्रकार संघ परिषदेचे पुरस्कार जाहीर पुणे विभागातून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची निवड मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन

 आदर्श तालुका पत्रकार संघ परिषदेचे पुरस्कार जाहीर 


पुणे विभागातून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची निवड 


मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन 



मुंबई : 

     मराठी पत्रकार परिषदेचे दिवंगत अध्यक्ष वसंतराव काणे आणि रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या  अनुक्रमे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची मुख्य विश्वस्त  एस.एम.देशमुख यांनी आज येथे घोषणा केली आहे. अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाला २०२४ चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी विविध तालुका, जिल्हा संघांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यातून खालील तालुका संघांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.. 


१) पुणे विभाग : पिंपरी - चिंचवड तालुका पत्रकार संघ, जिल्हा पुणे, २) लातूर विभाग : उमरगा तालुका पत्रकार संघ, जिल्हा धाराशिव, ३) कोल्हापूर विभाग : कणकवली तालुका पत्रकार संघ, कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग, ४) संभाजीनगर विभाग-सेलू तालुका मराठी पत्रकार संघ, सेलू जिल्हा परभणी, ५) अमरावती विभाग : खामगाव प्रेस क्लब (संलग्न मराठी पत्रकार परिषद) जि. बुलढाणा, ६) नागपूर विभाग : बुटीबोरी तालुका पत्रकार संघ, जिल्हा नागपूर, ७) नाशिक विभाग : शहादा तालुका पत्रकार संघ जिल्हा नंदुरबार, ८) कोकण विभाग : चिपळूण तालुका पत्रकार संघ, जिल्हा रत्नागिरी आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पुरस्कारासाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाची निवड करण्यात आली असल्याचे मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आलं आहे. 


       महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत असतात, त्याचबरोबर पत्रकारांचे हक्क आणि माध्यम स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी देखील ते कायम सतर्क असतात. अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्य पातळीवर पुरस्कार देऊन गौरव करण्याचा उपक्रम मराठी पत्रकार परिषदेने १२ वर्षांपासून सुरू केलेला आहे. पुरस्कार वितरणाचे हे सोहळे जाणीवपूर्वक राज्याच्या विविध भागात घेतले जातात. त्यानुसार नागपूर, पाटण, कर्जत अक्कलकोट, गंगाखेड, पालघर, वडवणी, माहूर आदि ठिकाणी यापुर्वी हे कार्यक्रम पार पडलेले आहेत. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा १ फेब्रुवारी २०२५ रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्कार विजेत्या सर्व तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचे एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमूख भरत निगडे यांनी अभिनंदन केले आहे.  


      सर्व पुरस्कार विजेत्या संघांनी पुरस्कार वितरण सोहळयास आपल्या सर्व सदस्यांसह उपस्थित राहून आपला पुरस्कार स्वीकारावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे. तालुका अध्यक्ष आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी  देखील कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्या

त आले आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies