धक्कादायक
पुरंदर मध्ये ट्रॅक्टर चालकाची आत्महत्या
राहत्या घरी अँगलला साडीने गळफास घेतलेला
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील थापेवाडी येथील शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर चालकाने राहत्या घरी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी घराचे दार वाजवल्यावर प्रतिसाद न दिल्याने खिडकीतुन पाहीले असता त्याने घराचे अँगलला साडीने गळफास घेतल्याचे दिसल्याने ट्रॅक्टर मालक बाळासाहेब काळुराम खवले रा.थापेवाडी (ता.पुरंदर) यांनी सासवड पोलीसांनी फिर्याद दिली आहे. ट्रॅक्टर चालक अभंग हरीभाऊ कांबळे (वय ३३ वर्षे) मुळ रा. ब्रम्हांण्डपुरी, सध्या रा. थापेवाडी (ता.पुरंदर) याने आत्महत्या केली आहे.
सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाळासाहेब काळुराम खवले रा.थापेवाडी (ता.पुरंदर) यांची शेती करण्याकरीता त्यांच्याकडे ट्रैक्टर आहे. ट्रॅक्टरवर चालक म्हणुन अभंग हरीभाऊ कांबळे वय ३३वर्षे मुळ रा. ब्रम्हांण्डपुरी सध्या रा. थापेवाडी ता. पुरंदर जि. पुणे गेले ८महीण्यांपासुन काम करतो व तो कुंटुंबासह खवले यांच्या घराच्या शेजारीच राहतो.
आज मंगळवार ०३ डिसेंबर रोजी सकाळी ०७ वा. अभंग यास उठविण्यासाठी खवले यांनी त्याचे घराचे दार वाजवले. परंतु त्याचा काही प्रतिसाद आला नाही. म्हणुन त्यांनी खिडकीतुन पाहीले तेव्हा त्यांना घराचे पत्र्याचे अँगलला साडीने गळफास घेतलेला दिसला. नंतर खवले यांनी गावचे पोलीस पाटील यांना फोन करुन सदरची हकीकत सांगीतली. पाटलांनी सासवड पोलीस स्टेशन येथे फोन करुन माहीती दिली. सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस तेथे आले त्यांनी अभंग कांबळे यांस ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दवाखाण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी कांबळे यांस तपासुन तो मयत झाल्याचे सांगीतले. तरी पुढील तजवीज व्हावी अशी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर. बी. अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स. फो. गायकवाड क
रीत आहेत.