*बीडमधील "आगाव"पणा*
दैनिकाच्या संपादकांना फोनवरून अर्वाच्च भाषेत धमक्या : धमक्या देणारे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
मुंबई :
मस्साजोग मधील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला असताना बीडमधून येणाऱ्या नकारात्मक बातम्या थांबता थांबत नाहीत. त्यामुळं बीडमध्ये चाललंय काय? बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अस्तित्वात आहे की नाही? असं म्हणायची वेळ आली आहे.
बीड येथील दैनिक "वास्तव" चे संपादक तथा डिजिटल मिडिया परिषदेचे पदाधिकारी जितेंद्र शिरसाठ यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्रीमती आगाव यांनी दूरध्वनीवरून फोन करून अर्वाच्च भाषेत धमक्या दिल्या, 'तू तातडीने येऊन मला भेट अन्यथा तुला उचलून आणण्याची मला व्यवस्था करावी लागेल' अशी अरेरावीची भाषा वापरली. जितेंद्र शिरसाट यांनी जिल्ह्यातील अवैध खनिज उत्खनना संबंधी बातमी छापली होती.
श्रीमती आगाव यांच्या अरेरावी मुळे बीड जिल्ह्यातील माध्यम जगतात संताप व्यक्त होत आहे. आगाव यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केली आहे.
"बीड जिल्हयातील सामांन्य माणूस दहशतीखाली आहे आता माध्यमांवर देखील दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, हे संतापजनक आणि निषेधार्थ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेऊन आगाव यांच्यावर कारवाई करावी" अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.