पुरंदर मधिल या गावातील कार गॅरेज जळाले.
१७ लाख ६० हजारांचे नुकसान : सासवड पोलीसांत नोंद
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील सासवड हद्दीत कुंभारवळण रोडवरील कार गॅरेजला मंगळवारी पहाटे आग लागली होती. या आगीत एक मोटारसायकल, पाच चारचाकी वाहने तसेच गॅरेजमधील साहित्य जळाले असून एकूण १७ लाख ६० हजारा रुपयांचे नुकसान झाले आहे. या जळीताची सासवड पोलीस स्टेशनमध्ये गॅरेज मालक उमेश लक्ष्मण कामठे वय ३१ वर्षे यांनी खबर दिली आहे. अशी माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी माध्यमांना दिली आहे.
सासवड पोलीस स्टेशनमध्ये उमेश कामठे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे कुंभारवळण रोडवर मौजे सासवड (ता. पुरंदर) येथे कामठे ॲटोमोबाईल नावाने कार गेरेज आहे. या गॅरेजवर कामगार म्हणुन महेश विवेकानंद कांबळे रा. सासवड (ता.पुरंदर) हा आहे. तो रात्री गॅटे केबीनचे वरील पार्टीषनमध्ये झोपतो. मंगळवार दि. १० रोजी पहाटे ०४.१२ मिनिटांनी कांबळे यांनी मला फोन करुन मला सांगितले की, गॅरेजमधील केबीनमध्ये कशाने तरी आग लागलेली आहे. तुम्ही येथे लवकर या. मी अग्निषामक दालाला फोन करून आग लागलेली असले बाबत माहीती दिली व लागलीच गॅरेजवर पोहचल्यावर पाहीले गॅरेजमधील केबीन व कामास आलेल्या गाड्यांना आग लागून जाळ निघत होता. मी कामास आलेल्या गाड्यांपैकी सफारी गाडी, मारूती ८०० गाडी व झायलो या गाड्यांची पुढील काच फोडुन कामगार व त्याचे मित्रांचे मदतीने पाठीमागे घेतल्या होत्या. ०४.४५ वाजण्याच्या सुमारास अग्निषामक दालाची गाडी गॅरेजवर पोहोचली. त्यांनी गॅरेजला लागलेली आग विझवली. कामगार महेष कांबळे यास आग कशी लागली असे विचारले असता त्याने मला सांगितले की मी व मित्र दत्ता दयानंद कांबळे, विजय साळीग्राम राठोड असे आपले गॅरेजमधील केबीनचे वरचे पार्टीषनमध्ये झोपलेलो होतो. अचानक आंम्हाला खालुन पाठीला चटके बसायला लागल्याने आंम्ही सर्वांनी खाली उड्या मारल्या व गॅरेजचे बाहेर येऊन तुम्हाला फोन केला आहे असे सांगितले.
या लागलेल्या आगीमध्ये गॅरेजमधील गाडी उचलणेचा रॅम्प, त्याची पाँवर पॅक मोटार, कार वॉषिंगची मशीन, एअर कॉम्प्रेसर, कार व्हॅक्युम क्लीनर, टुल कीट पॅनल, लाकडी कपाट, केबीन, पाण्याची टाकी असे जळून ६ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच त्याचा मित्र दत्ता दयानंद कांबळे याची आई सरीता दयानंद कांबळे यांचे नावे असलेली होंडा शाईन मोटार सायकल नं एम एच १२ यु. ई ७१९६ ही जळुन अंदाजे ६० हजारांचे नुकसान झाले आहे. संकेत सुरेश तिकोणे रा. सासवड (ता. पुरंदर) यांचे नावे असलेली हयुंदाई सॅन्ट्रो कार नं एम एच १२ यु सी ३०५३ ही पुर्णपणे जळुन अंदाजे ४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. विराज अशोक जगताप रा. सासवड (ता.पुरंदर) यांची महींद्रा कंपनीची के. यु. व्ही १०० गाडी नं एम. एच.१२ एम. आर. ९२१८ ही पुर्णपणे जळुन अंदाजे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. दत्तात्रय अनंता कामठे रा. कुभारवळण (ता. पुरंदर) यांची मारूती ८०० गाडी नं एम एच १२ एफ. एफ. ५७६८ ही पुर्णपणे जळुन अंदाजे ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. रमेश बाळासो नारगे रा. चिव्हेवाडी (ता.पुरंदर) यांची टाटा सफारी गाडी नं एम एच ०४ डी. वाय.५४९६ हीचे ड्रायव्हर बाजु, बोनेट, हेडलाईट, बंपर जळुन अंदाजे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. निलेश जाधव रा. सासवड (ता. पुरंदर) यांची गॅरेजचे पाठीमागील बाजुस पार्कीग केलेली मारूती स्वीफ्ट कार नं एम. एच. १२ एम. डब्ल्यु. ३४३६ ही पुर्णपणे जळुन अंदाजे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. एकुण सदर जळीता मध्ये माझे गॅरेज मधील व गॅरेमध्ये कामास आलेल्या वरील लोकांच्या गाड्या असे अंदाजे १७ लाख ६० हजार रूपयांचे या जळीता मध्ये नुकसान झालेले आहे. सदर जळीता बाबत माझी कोणावर संशय व ही नसुन कोणा विरूध्द तक्रार नाही. तरी सदर जळीता बाबत पुढील तजविज व्हावी. अशी माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.