Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर ३ डिसेंबर "पत्रकार आरोग्य दिन" म्हणून साजरा होतो.

 पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर 

३ डिसेंबर "पत्रकार आरोग्य दिन" म्हणून साजरा होतो.




पुणे (प्रतिनिधी ):- राज्यातील समस्त मराठी पत्रकारांच्या स्वाभिमान आणि न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या ८६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार  मंगळवार  दि. ३ डिसेंबर रोजी पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका पत्रकार संघांच्या पुढाकाराने प्रत्येक तालुक्यात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी दिली. 


     ३ डिसेंबर १९३९ रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे "पत्रकार आरोग्य दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात. गेल्या वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांना राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील २६५ तालुक्यात ही शिबिरं झाली. त्यात १० हजरांपेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हा जागतिक विक्रम होता. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे ३ डिसेंबर २०२४ रोजी राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात येणार आहेत. राज्यात ३५४ तालुके आहेत या सर्व तालुक्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक पत्रकारांनी पुढाकार घेऊन ही शिबिरं यशस्वी करावीत असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केलं आहे.

     पत्रकारांचं आयुष्य दगदगीचं असतं. जागरण, अवेळी जेवण, तणाव या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो. मात्र हे दुखणे अनेकदा अंगावर काढले जाते. विषय हाताबाहेर जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशी वेळ कोणत्याच पत्रकारावर येऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठीच ही शिबिरं होत आहेत. स्थानिक पातळीवर सर्व पत्रकारांनी एकत्र येत शिबिरं यशस्वी करावीत असं आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष हाजी मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी, सहप्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार यांनी केले आहे. 


     पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे नियोजन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे  अध्यक्ष - सुनील लोणकर, (पुरंदर) सरचिटणीस - सतिश सांगळे, (इंदापूर) जिल्हा संघटक - सुर्यकांत किंद्रे,(भोर), अनिल वडघुले (पिंपरी चिंचवड), चिराग फुलसुंदर, (पिंपरी चिंचवड ), उपाध्यक्ष -सचिन कांकरीया -(जुन्नर), मदन काळे - (शिरूर), हनुमंत देवकर -(चाकण), चिंतामणी क्षीरसागर - (बारामती), रमेश निकाळजे (हवेली), संतोष म्हस्के (भोर), कोषाध्यक्ष  -प्रा. संतोष काळे (दौंड), सहचिटणीस - किरण दिघे (भोर महामार्ग), सहकोषाध्यक्ष - संजय शेटे (खेड), कार्यालयीन चिटणीस : जीवन शेंडकर (दौंड), जिल्हा समन्वयक : मारुती बाणेवार (मुळशी), रविंद्र वाळके (आंबेगाव), प्रवक्ता : सावता झोडगे (आंबेगाव), प्रसिद्धी प्रमुख : अर्जुन मेदनकर (आळंदी), सहप्रसिध्दी प्रमुख : रोहित नलावडे (वेल्हे), परिषद प्रतिनिधी : एम. जी. शेलार (दौंड), वरीष्ठ जिल्हा सल्लागार : नितिन बारवकर, संतोष वळसे, रमेश वत्रे, ज्ञानेश्वर रायते, संजय इंगुळकर, दत्तानाना भोंगळे, श्रीराम कुमठेकर, नाथाभाऊ उंद्रे. 


     जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक - बी. एम. काळे, जिल्हा तंटामुक्ती समिती प्रतिनिधी : सुनिल भांडवलकर, जिल्हा निवडणुक निरीक्षक : सुनील वाळुंज, सारंग शेटे, दत्ता भालेराव, रविंद्र पाटील, पुणे जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष -राहुल शिंदे, कार्यकारीणी सदस्य - किरण भदे (भोर), ए.टी .माने (पुरंदर), अमर गायकवाड (चाकण), सुनील जाधव (बारामती), रोहित वाघमोडे (इंदापूर), सुनील शिरसाट (हवेली), सुरेश भुजबळ (जुन्नर), विश्वास दामगुडे (वेल्हा), दत्ता बांदल(भोर), बापु पाटील (मावळ), राजेश नागरे (आळंदी), सुनिल पवार -प्राधिकरण, बंडू दातीर (मुळशी), हेमंत गडकरी (बारामती), महिला जिल्हाध्यक्षा : श्रावणी कामत (मावळ), सचिव छाया नानगुडे, महिला प्रतिनिधी सुजाता गुरव, महिला उपाध्यक्षा : सुनिता कसबे (पुरंदर), समन्वयक : रेखा भेगडे, कार्यकारणी सदस्य वर्षा जाधव, प्रज्ञा आबनावे, (मावळ) पुणे शहर अध्यक्ष : बाबा तारे, शहर उपाध्यक्ष : मंगेश कुमार हिरे, शहर सरचिटणीस : प्रमोद गव्हाणे, शहर कोषाध्यक्ष : धनराज खंडाळे आदींसह पुणे जिल्हा पत्रकार संघाघे सर्व सभासद बंधू-भगिनी, पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका अध्यक्ष, सचिव सर्व कार्यकारिणी पदाधिकारी करणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies