पुरंदर विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांचे चिन्ह.
नऊ उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांचे तर सात अपक्षांना वेगवेगळी चिन्हे.
पुरंदर : पुरंदर विधानसभा निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. आज सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३३ उमेदवारी अर्जांपैकी १७ उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असणार आहेत. या निवडणुकीत नऊ उमेदवारांनी आपल्या राष्ट्रीय पक्षांकडून अर्ज ठेवत पक्षांची अधिकृत चिन्हे पटकावली तर सात अपक्ष वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुकीला सामोरे जात आहेत.
पुरंदरच्या विधानसभा निवडणुकीत दिग्गजांनी आप आपल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. या शिवाय अपक्ष ही अर्ज दाखल केले होते. आता या दिग्गजांनी अर्ज माघारी घेतले असले तरी ते आपल्या मुळ पक्षाच्या उमेदवाराला मतदान करुन सहकार्य करतात की पुरंदरचा पुर्वीचा इतिहास गिरवतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. सर्व सामान्य मतदारांनी मात्र आजच आपले मत कोणाला द्यायचे हे निश्चित केले आहे. उद्या पासून निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचेल. मोठ्या सभा, आरोप, प्रत्यारोप, विकास कामांचे श्रेयवाद हे सांगण्यात नेते दंग होतील.
पुरंदर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नाव व चिन्ह
१) सुरज घोरपडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पेनाची निब सात किरणांसह
२) किर्ती माने वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर
३) संजय निगडे राष्ट्रीय समाज पक्ष शिट्टी
४) संजय जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हात
५) सुरज भोसले बहुजन समाज पार्टी हत्ती
६) अनिल गायकवाड अपक्ष लिफाफा
७) उमेश जगताप महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजिन
८) अतुल नागरे अपक्ष कढई
९) संभाजी झेंडे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ
१०) विजय शिवतारे शिवसेना धनुष्यबाण
११) महादेव खेंगरे पाटील पेट्रोल पंप
१२) उत्तम कामठे संभाजी ब्रिगेड पार्टी ट्रमपेट
१३) शेखर कदम अपक्ष विहीर
१४) विशाल पवार अपक्ष सितार
१५) डॉ.उदयकुमार जगताप अपक्ष स्टेस्थोस्कोप
१६) सुरेश वीर अपक्ष ग्रामोफोन