पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी.
याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..
पुरंदर :
राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा ज्वर वाढत असतानाच पुरंदर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रशासकीय इमारत सासवड मध्ये होत आहे. पोस्टल मतदान मोजणीला सकाळी सुरवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत विजय शिवतारे 1,820 ने पुढे, शिवतारेंना 4727 मते संजय जगताप दुसऱ्या क्रमांकावर 2907 तर संभाजी झेंडे तीसऱ्या क्रमांकावर 1554 होते. शेवटच्या 30 व्या फेरी अखेर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 24 हजार 188 मतांनी आमदार संजय जगताप यांच्या वर दणदणीत विजय मिळवला आहे.
पुरंदर विधानसभा निवडणुकीत यावर्षी विक्रमी ६१.०२ टक्के मतदान झाले होते. १६ उमेदवार आपले आमदारकीचे नशीब आजमावत असले तरी, महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यातच खरी लढत होताना दिसून आली.
शिवतारे यांच्या दमदार विजयाचा गुलाल सासवडसह पुरंदरच्या गावागावातील शिवसैनिकांनी उधळला आहे. फटाक्यांची आतषबाजी करता 'कोण आला रे कोण आला शावसेनेचा वाघ आला, 'जय श्रीराम' अशा घोषणा देत बाईक रॅली काढत आहेत. शिवतारे यांच्या विजयाने शिवसेनीकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी २ लाख ४० हजार ५३८ पुरुष मतदार, २ लाख २३ हजार ४४६ महिला मतदार तर ३३अन्य असे एकुण ४ लाख ६२ हजार १७ मतदारांची नोंद होती. त्यापैकी १ लाख ४९ हजार ०७१ पुरुषांनी, १ लाख ३३ हजार २९९ महिला, तर ६ अन्य असे एकुण २ लाख ८२ हजार ३७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विक्रमी ६१.०२ टक्के मतदान झाले होते.
दुसऱ्या व तिसऱ्या फेरी अखेर विजय शिवतारे 13,166, संजय जगताप 8,367, संभाजी झेंडे 4,238 मते पडली आहेत. विजय शिवतारे 4 हजार 799 मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीत अखेर विजय शिवतारे 17 हजार 828 संजय जगताप 11 हजार 324, तर संभाजी झेंडे यांना 5 हजार 628 मते पडली आहेत. विजय शिवतारे 6 हजार 504 मतांनी आघाडीवर आहेत.
पाचव्या फेरीत अखेर विजय शिवतारे 21 हजार 584 संजय जगताप 14 हजार 353, तर संभाजी झेंडे यांना 7 हजार 499 मते पडली आहेत. विजय शिवतारे 6 हजार 504 मतांनी आघाडीवर आहेत.
सहाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 25 हजार 104 संजय जगताप 16 हजार 759, तर संभाजी झेंडे यांना 9 हजार 611 मते पडली आहेत. विजय शिवतारे 8 हजार 345 मतांनी आघाडीवर आहेत.
सातव्या फेरी अखेर विजय शिवतारे 28 हजार 757 संजय जगताप 19 हजार 144, तर संभाजी झेंडे यांना 11 हजार 011 मते पडली आहेत. विजय शिवतारे 9 हजार 613 मतांनी आघाडीवर आहेत.
आठव्या फेरी अखेर विजय शिवतारे 33 हजार 751 संजय जगताप 21 हजार 970, तर संभाजी झेंडे यांना 12 हजार 170 मते पडली आहेत. विजय शिवतारे 11 हजार 781 मतांनी आघाडीवर आहेत.
नवव्या फेरी अखेर विजय शिवतारे 39 हजार 036 संजय जगताप 24 हजार 917, तर संभाजी झेंडे यांना 13 हजार 505 मते पडली आहेत. विजय शिवतारे 14 हजार 119 मतांनी आघाडीवर आहेत.
दहाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 44 हजार 624 संजय जगताप 28 हजार 117, तर संभाजी झेंडे यांना 15 हजार 074 मते पडली आहेत. विजय शिवतारे 16 हजार 507 मतांनी आघाडीवर आहेत.
अकराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 49 हजार 402 संजय जगताप 31 हजार 164, तर संभाजी झेंडे यांना 16 हजार 678 मते पडली आहेत. विजय शिवतारे 18 हजार 234 मतांनी आघाडीवर आहेत.
बाराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 53 हजार 961 संजय जगताप 34 हजार 052, तर संभाजी झेंडे यांना 18 हजार 317 मते पडली आहेत. विजय शिवतारे 19 हजार 909 मतांनी आघाडीवर आहेत.
तेराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 57 हजार 045 संजय जगताप 37 हजार 854, तर संभाजी झेंडे यांना 19 हजार 969 मते पडली आहेत. विजय शिवतारे 19 हजार 191 मतांनी आघाडीवर आहेत.
चौवदाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 62 हजार 214 संजय जगताप 41 हजार 372, तर संभाजी झेंडे यांना 21 हजार 979 मते पडली आहेत. विजय शिवतारे 20 हजार 842 मतांनी आघाडीवर आहेत.
पंधराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 67 हजार 087 संजय जगताप 44 हजार 903, तर संभाजी झेंडे यांना 23 हजार 645 मते पडली आहेत. विजय शिवतारे 22 हजार 184 मतांनी आघाडीवर आहेत.
सोळाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 71 हजार 664 संजय जगताप 47 हजार 720, तर संभाजी झेंडे यांना 27 हजार 488 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 944 मतांनी आघाडीवर आहेत.
सतराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 75 हजार 421 संजय जगताप 49 हजार 735, तर संभाजी झेंडे यांना 30 हजार 142 मते पडली आहेत. विजय शिवतारे 25 हजार 686 मतांनी आघाडीवर आहेत.
अठराव्या फेरी अखेर विजय शिवतारे 80 हजार 081 संजय जगताप 54 हजार 713, तर संभाजी झेंडे यांना 31 हजार 003 मते पडली आहेत. विजय शिवतारे 25 हजार 368 मतांनी आघाडीवर आहेत.
एकोणिसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 83 हजार 786 संजय जगताप 59 हजार 319, तर संभाजी झेंडे यांना 31 हजार 763 मते पडली आहेत. विजय शिवतारे 24 हजार 467 मतांनी आघाडीवर आहेत.
विसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 86 हजार 465 संजय जगताप 63 हजार 701, तर संभाजी झेंडे यांना 33 हजार 253 मते पडली आहेत. विजय शिवतारे 22 हजार 764 मतांनी आघाडीवर आहेत.
एकविसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 90 हजार 464 संजय जगताप 67 हजार 580, तर संभाजी झेंडे यांना 34 हजार 806 मते पडली आहेत. विजय शिवतारे 22 हजार 884 मतांनी आघाडीवर आहेत.
बाविसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 94 हजार 833, संजय जगताप 71 हजार 128, तर संभाजी झेंडे यांना 36 हजार 682 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 705 मतांनी आघाडीवर आहेत.
तेवीसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 99 हजार 001, संजय जगताप 75 हजार 030, तर संभाजी झेंडे यांना 38 हजार 067 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 971 मतांनी आघाडीवर आहेत.
चोवीसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 02 हजार 302, संजय जगताप 80 हजार 446, तर संभाजी झेंडे यांना 39 हजार 075 मते पडली आहेत. विजय शिवतारे 21 हजार 856 मतांनी आघाडीवर आहेत.
पंचवीसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 05 हजार 819, संजय जगताप 83 हजार 584, तर संभाजी झेंडे यांना 39 हजार 899 मते पडली आहेत. विजय शिवतारे 22 हजार 235 मतांनी आघाडीवर आहे
26 फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 10 हजार 055, संजय जगताप 86 हजार 841, तर संभाजी झेंडे यांना 40 हजार 744 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 214 मतांनी आघाडीवर आहेत.
27 व्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 13 हजार 993, संजय जगताप 90 हजार 154, तर संभाजी झेंडे यांना 42 हजार 110 मते पडली आहेत. विजय शिवतारे 23 हजार 839 मतांनी आघाडीवर आहेत.
28 व्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 17 हजार 728, संजय जगताप 93 हजार 391, तर संभाजी झेंडे यांना 43 हजार 672 मते पडली आहेत. विजय शिवतारे 24 हजार 337 मतांनी आघाडीवर आहेत.
29 व्या फेरी अखेर विजय शिवतारे 1लाख 22 हजार 325, संजय जगताप 96 हजार 218, तर संभाजी झेंडे यांना 45 हजार 168 मते पडली आहेत. विजय शिवतारे 26 हजार 107 मतांनी आघाडीवर आहेत.