पुरंदर विधानसभा आदर्श आचारसंहिता भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद
पुरंदर दि. ९
पुरंदर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये मौजे फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजवर पुरंदर विधान सभेचे शिवसेना उमेदवार माजी मंत्री व उमेदवार विजय शिवतारे, यांच्या प्रचारार्थ एअर बलून हा परवानगी न घेता लावून आचार संहिता भंग केल्या बाबतची तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेली असता नोडल अधिकारी, आचार संहिता कक्ष यांनी कर्तव्यावर असलेल्या FST पथक प्रमुख ३, यांना संदर्भ क्रमांक २ अन्वये कळविले आहे.
उपरोक्त तक्रारीचे अनुषंगाने FST पथक क्रमांक ३ यांनी प्रत्यक्ष मौजे फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग येथे भेट दिली असता त्या ठिकाणी इमारतीच्या टेरेस लगत सदरचा एअर बलून बांधलेला दिसून आलेला आहे. याबाबत लॉजच्या मालकांबाबत विचारणा केली असता त्यांचे नाव अक्षय अरुण पवार असून ते बाहेर असल्याचे तेथील कामगार नामे शुभम श्रीमंत रसाळ यांने सांगितले सदर मालकांना दूरध्वनीव्दारे संपर्क करुन एअर बलून लावण्यासाठी परवानगी घेतली आहे का या बाबत विचारण केली असता सदर बलूनच्या परवानगीसाठी अर्ज केला असून अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक आदर्श आचार संहिता लागु असताना फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉज चे मालक अक्षय अरुण पवार यांनी पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे, यांचा शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण असलेला एअर बलून कोणतीही परवानगी न घेता सदर लॉजच्या इमारतीच्या टेरेसवर बांधून आदर्श आचार संहितेचा भंग करुन खाजगी ठिकाणच्या जागेचे विद्रपीकरण झाल्याने संबंधितां विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलम ३, व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५०,१९५१,१९८९ कलम १३० कलमातील तरतूदी अन्वये आचारसंहिता कक्षाकडील भरारी पथक क्रमांक ३ यांनी हडपसर, पोलिस स्टेशन, हडपसर येथे FIR क्रमांक १७२५/२०२४ दिनांक ०९.११.२०२४ वेळ ००.२५ वा. नुसार संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद केला आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्ष लांडगे यांनी दिली.