Type Here to Get Search Results !

पुरंदरच्या निवडणुकीत म.वी. आघाडी व महायुतीत सर्व काही आलबेल आहे? दुखावलेली मने जुळवण्यासाठी अर्थपूर्ण कसरत : रातोरात नेते भुमिका तर नाही बदलणार?

 पुरंदरच्या निवडणुकीत म.वी. आघाडी व महायुतीत सर्व काही आलबेल आहे? 


दुखावलेली मने जुळवण्यासाठी अर्थपूर्ण कसरत : रातोरात नेते भुमिका तर नाही बदलणार?




पुरंदर : पुरंदर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार असली तरी, उमेदवारी न मिळालेल्यांची मनधरणी करण्यात उमेदवारांची कसरत पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे सहकारी एकसंध दिसतं असले तरी ऐनवेळी काही दिग्गज रातोरात काही वेगळी भुमिका घेतील का हे पहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. तसेच महायुतीत दुखावलेली मने जुळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांना अर्थपूर्ण कसरत करावी लागत असल्याची चर्चा आहे. 


    काल बुधवारी द न्युज मराठीने महायुतीचे पक्षाचे दिग्गज प्रचारात दिसत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याची दखल रातोरात घेत आज गुरवारी सकाळीच पुण्यात पक्षाच्या अध्यक्षांन समोर हजेरी लावून बोलणी करण्यात आली. फक्त उमेदवाराचा प्रचारच करायचा नाही तर उमेदवार निवडूनच आणायचा असा चंग बांधण्यात आला आहे. 


   महाविकास आघाडीतून संजय जगताप यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात ही आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचारात प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. सासवड, जेजुरी नीरा शहरांसह ग्रामीण भागातील युवक कार्यकर्ते घरोघरी जाऊन उमेदवाराचे चिन्ह पोहचवत आहेत. फिरत्या प्रचाराच्या गाड्यांचा ताफा ही जगतापांचा जास्तीचा दिसून येत आहे. 


    महायुतीच्या वतीने दोन उमेदवार जाहीर केल्याने घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांचा अर्ज भरते वेळी भाजपचे नेते व माजी आमदार अशोक टेकवडे व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र भाजपच्या इतर दिग्गजांनी शिवतारेंकडे पाठ फिरवली होती. सोमवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर दोन दिवस काहीही भुमिका घेतली गेली नाही. आज गुरुवारी ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार आता शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचारात सहभागी होणार आहेत. एका भाजपच्या नेत्याने विमानतळाला विरोध दर्शवत चक्क पक्षाच्या पदाचा राजीनामा तालुका अध्यक्षांकडे दिला आहे. तर निवडणुक लढविण्यावर ठाम असलेले पण पक्ष हितासाठी माघार घेतलेले गंगाराम जगदाळे यांनी गुरुवारच्या बैठकीकडे पाठ फिरवत आपली भुमिका शनिवारी ९ नोव्हेंबरला जाहीर करणार असल्याचे समजते. 


      सोमवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक महायुती कोणाचा प्रचार करणार हे निश्चित झाले नाही. परिणामी मंगळवार व बुधवारी ते वेट अँड वॉचच्या भुमिकेत दिसून आले. अजित पवार गटाचे दत्ता झुरुंगे व राजेंद्र धुमाळ यांनी झेंडे यांनी घड्याळाच झेंडा घेऊन प्रचारात आघाडी घेतली. तर पक्षाचे जेष्ठ प्रा. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष उत्तम धुमाळ,पुरंदर हवेली अध्यक्ष वामनराव जगताप, विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, सोमेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कामथे, गणेश जगताप, अरुण जगताप, यांनी गुरुवारी पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांची भेट घेऊन पुढिल काळात यांची पदे मिळावीत यासाठी बोलणी केल्याचे समजते. 


चौकट १)

  महायुतीतून संभाजी झेंडे व विजय शिवतारे यांन उमेदवारी दिली गेल्याने मैत्रीपूर्ण लढत असे गोंडस नाव देण्यात आले आहे. दोघे ही तालुक्यात दिग्गज मानले जातात. शिवतारे यांचे मेव्हणे दिलिप यादव तसेच यादवांचे नातेवाईक व कट्टर शिवसैनिक यांच्या पाठिंब्यावर शिवतारे पुरंदरचा गड सर करतात का? हे आगामी काळात समजेल. तर संभाजी झेंडे यांची दोन गावात मोठी भावकी, त्यांचे तालुकाभर तसेच हवेली तालुक्यात गावोगावी असलेले पाहूणे यांनी झेंडे साहेबांसोबतचे राहण्याचा मार्ग अवलंबलेला दिसून येत आहे. झेंडे आडनावाच्या एकातरी कुटुंबातील सदस्यांचे थेट नातेवाईक पुरंदरच्या ९० गावात दिसून येत आहेत. या नातेगोत्यातील प्रत्येक माणूस बदल हवाची हाक देत आहे. 

  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies