Type Here to Get Search Results !

पुरंदर विधानसभा मतदारसंघ मतमोजणी करिता प्रशासन सज्ज

 पुरंदर विधानसभा मतदारसंघ मतमोजणी करिता प्रशासन सज्ज




पुरंदर : 

       पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी 413 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाच्या अनुषंगाने उद्या शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता नवीन प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 


   मतमोजणी निवडणूक निरीक्षक  म्हणून कुमार राजीव रंजन (भा.प्र.से.) यांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांचे समन्वय अधिकारी मिलिंद टांकसाळे, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर-१ हे असतील. मतमोजणी कामकाजाकरिता विविध २६ पथके स्थापन करण्यात आलेली असून त्यामध्ये एकूण १२६ अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.तसेच आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे. मतमोजणीसाठी १४+(२ राखीव) टेबलचे नियोजन करण्यात आले असून त्यात प्रत्येकी तीन कर्मचारी असतील व दिवसभरामध्ये 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणीचे काम पूर्ण होईल. 


      नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये  विशेष माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालय मार्फत प्रवेशपत्र (पास) देण्यात आलेल्या पत्रकार/माध्यम प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या कक्षाचे समन्वय अधिकारी ओंकार शेरकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे असून, माध्यमांशी समन्वय साधून त्यांना मतमोजणी संबंधी माहिती पुरवण्याचे कार्य त्यांच्यामार्फत केले जाणार आहे. मतमोजणी दरम्यान नागरिकांना मात्र सदर ठिकाणी प्रवेश मिळणार नसून प्रशासकीय इमारतीच्या 100 मीटर कक्षाच्या बाहेरच थांबावे लागणार आहे. नागरिकांनी  प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासकीय इमारत परिसरामध्ये गर्दी करू नये असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री सचिन मस्के यांनी नागरिकांना केले आहे. 


    उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी आठ वाजता त्यांना दिलेले प्रवेशपत्राच्या आधारे मतमोजणी उमेदवार प्रतिनिधी कक्षामध्ये प्रवेश करता येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies