पुरंदरच्या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात
संजय जगताप, विजय शिवतारे, संभाजी झेंडे निवडणूक लढवणार : दिग्गजांच्या तलवारी म्यान.
पुरंदर :
पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरपर्यंत संभाजी झेंडे यांचा अर्ज माघारी घेण्यात आला नाही. त्याचबरोबर विजय शिवतरे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे महायुतीतून मैत्रीपूर्ण लढत होणार हे आता स्पष्ट झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांना घड्याळाचे चिन्हावर उमेदवारी दिली आणि त्यामुळे महायुतीमध्ये संघर्ष होताना पाहायला मिळणार आहे. उमेदवारी माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत ३३ उमेदवारी अर्जांपैकी १७ उमेदवारी अर्ज अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असणार आहेत. पक्षांचे एबी फॉर्म असलेल्या उमेदवारांनी ही आपले अपक्ष अर्ज माघारी घेतले आहेत. या बाबतीची अधिकृत घोषणा सायंकाळी पाच वाजता पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करणार आहेत.
यामध्ये काँग्रेस कडून म्हणजेच महाविकास आघाडी कडून संजय जगताप हाताचा पंजा, महायुती मधून शिवसेनेचे विजय शिवतरे हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे संभाजी झेंडे हे घड्याळाच्या चिन्हावर असतील.
नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले उमेदवारांची नावे
1. दत्तात्रय मारुती झुरंगे अपक्ष
2. दिगंबर गणपत दुर्गाडे अपक्ष
3. दिलीप विठ्ठल गिरमे अपक्ष
4. शंकर बबन हरपळे अपक्ष
5. संदीप उर्फ गंगाराम मारुती जगदाळे अपक्ष
6. जगताप अभिजीत मधुकर अपक्ष
7. संदीप बबन मोडक अपक्ष
8. आकाश विश्वनाथ जगताप अपक्ष
9. जालिंदर सोपान कामटे अपक्ष
10. गणेश बबनराव जगताप अपक्ष