पुरंदर विधानसभा निवडणुकीत झाले इतके मतदान
सकाळ संध्याकाळी मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर.
पुरंदर :
पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०२ टक्के मतदान झाले होते, रात्री सव्वा अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार ६०.०१ टक्के मतदान झाले आहे. सकाळी वेगात मतदान झाले, दुपारी वेग मंदावला असला तरी सायंकाळी चार ते सहा दरम्यान मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला.
पुरंदर विधानसभा निवडणुकीत १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ४.२८ टक्के, अकरा वाजेपर्यंत १४.४ टक्के, एक वाजेपर्यंत २७.३५ टक्के, तीन वाजेपर्यंत ४०.३२ टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०२ टक्के, तर सायंकाळी पाच नंतर मतदान प्रक्रिया संपेपर्यंत ६०.०१ टक्के मतदान झाल्याची माहिती पुरंदरच्या निवडणूक अधिकारी वर्षा लांडगे यांनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास दिली आहे.
पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी २ लाख ४० हजार ५३८ पुरुष मतदार, २ लाख २३ हजार ४४६ महिला मतदार तर ३३अन्य असे एकुण ४ लाख ६४ हजार १७ मतदारांची नोंद होती. त्यापैकी पाच वाजेपर्यंत १ लाख २८ हजार ३३९ पुरुषांनी, १ लाख १७ हजार ६६८ महिला, तर २ अन्य असे एकुण २ लाख ४६ हजार ००९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. स्त्री पुरुष मतदानाची अंतिम आकडेवारी व टक्केवारी प्रशासनाकडून प्राप्त होताच टाकण्यात येईल.